अलमारीची जादू…

  • by

या क्षणी ना…
मी सगळ्यात सुंदर क्षण जगतेय. जो प्रत्येकाला हवा असतो. एक शक्तिमान वाय फाय, उबदार चादर, दांगट पलंगाशेजारी चार्जर, स्क्राचेस न पडलेला स्मार्टफोन, फोनमधल्या भावना डायरेक्ट मनात नेणारे हेडफोन्स, खिडक्यांमधून येणारा मऊ वारा, प्रवृत्त करणारा काळोख… नि ऑनलाईन कोणीही नाही.
‘तो’ सुद्धा नाही…
स्पेस नावाचं बटण आयुष्यात असली की सुखाची सावली मिळते.
करियर, तारुण्य, नाती, काम या सगळ्याला त्याची स्वतंत्र स्पेस द्यावी. खूप घाई केली, संपवण्याची अगतिकता झाली की ते संपतच. !

प्रत्येक गोष्ट बंद अलमारीसारखी असते!
शब्दांच्या जादुई गोष्टीसारखी असते!
एका नव्या कोऱ्या कागदासारखी असते!
एका अशा लेखासारखी असते, ज्याची सुरुवात होताना वेगळच टोक पकडलेला लेखक, दुसऱ्या क्षणी कैक टोकांना पार करून त्याच्या आत्म्याच्या समाधानापर्यंत पोहोचतो. त्यामुळे, या प्रत्येक अलमारीच्या लुप्त कप्प्यांना हळूहळू उघडूया. एक कप्पा पूर्ण करून संपवण्यात त्याची मजा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्या इतपत कमी आहे, कारण अलमारीची मजा रोज उघडण्यात आहे. तिच्यातल्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला बघण्यात आहे.

रुमाल, साडी, बांगड्या, शर्ट, पँट, चोरकप्पा… या प्रत्येक गोष्टीसाठी असलेल्या प्रत्येक कप्प्यात त्या गोष्टीची वेगळी आठवण आहे आणि याच आठवणीत कुठेतरी आपल्या क्षणांची अन् मेहनतीची साठवण आहे, मोल आहे आणि किंमतही आहे!

प्रत्येक गोष्टीची मेहनत, तिच्या मागची कथा वेगळी आहे.

अलमारितील प्रत्येक गोष्टीमुळे अपूर्ण असणारे आपण कसे असे एका क्षणात सगळं संपवून मोकळे होण्याचा प्लॅन करतो. ?
असं लगेच पूर्ण करून नव्या कोऱ्या कपड्याप्रमाणे नाती, करियर, तारुण्य, काम नाही घडी घालून ठेवता येत. त्याची घडी रोज मोडावीच लागते, कित्येक प्रयत्नांचे मनोरे रचल्यानंतर त्यातील एक घडी दिवसापुरती घट्ट बसते. प्रवास थांबत नाही, रोज नव्या सुर्याबरोबर नवा विचार घेऊन घातलेल्या घडीला उलगडावं लागतं.
दिवसभराच्या डोक्याच्या मार्गाने उकल करण्यात,  अंगाखांद्यावर खेळवण्यात आणि रात्रीच्यावेळी त्याच्या त्याच्या जागी सुपूर्द करण्यात सुखाचं मेख असतं.

त्यामुळे या कप्प्यांना स्वतः प्रमाणे स्वतंत्र सुख देत,  रात्रीच्या वेळी अलमारीच दार स्पेस देऊन बंदच करायचं…

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *