पडलेल्या भिंतीत प्रेमाचा पालव फुटला … ती भिंत तशी कोसळली …
दोघांच्या पुढ्यात अडकलेल्या वर्तमानाचे तुकडे स्तब्ध राहिले…. ती तिच्या विचारात मग्न होती. जे घडलं तिला कळलं नव्हतं.
तिला त्या ‘वेळी’ बघून तो मनाला ओंजळीत घेऊन एका कप्प्यात लाजत राहिला…
प्रेम असतंच मनावर, पण शरीराचं आकर्षण हा त्यातला सोहळा असेल कदाचित!
केसांना शिकाकाई लावून ती पाण्याचा मग केसांवर रिता करत होती, तेवढ्यात हे घडलं होतं. टीव्हीवर चक्रीवादळाच्या बातम्या चालू होत्या. इकडे त्याचा फटका बसून भिंतीला भेग गेली होती. दोघांच्या घरांमध्ये केवळ एका भिंतीचं अंतर होतं. त्यालाही भेग पडल्यामुळे दोघे पुरते घाबरून गेले होते.
या अशा वातावरणात दोघे आपापल्या घरात कामात मग्न राहून मन गुंतवण्याचा प्रयत्न करत होते. ती रोजच्या सारखं अंघोळीला गेली. याने मुद्दामच टीव्हीवरच्या बातम्या बंद करून रेडिओच बटण दाबल…
दोघे एकमेकांचे शेजारी होते, त्यामुळे भिंत खचली असली तरी शेजार पक्का होता. ती वयात आलेली होती, तो सुद्धा. दोघे एरवी येता जाता एखादं ओळखीचं हसू पास करायचे, एवढीच ओळख होती. पण आज प्रशांतच्या घरातून रेडिओचा आवाज तिच्या भिंतीतून त्या ओळखीच्या हास्यासारखाच पास होत होता. रेडिओला “आनेवाला पल, जानेवाला है।
हो सके तो इस में जिन्दगी बिता दो,
पल जो ये जानेवाला है।” क्या बात है! म्हणत तो त्या तंद्रीत मग्न झाला.
दोघांची मन भीतीने तुडुंब भरलेली होती. पण दोघांनाही या जगात होणाऱ्या कुठल्याच घटनेचा तसूभर विचार करायचा नव्हता. तो डोळे मिटून खुर्चीत गाणी ऐकत बसला… ती अंघोळीला गेली होती …
ती तिच्या विचारात मग्न, विचार करत होती काल भाजी आणायला गेले तेव्हा त्या भाजीवाल्याने मास्क घातला होता का? बरेच दिवस झाले हेल्दी काही केलं नाही. कसतरीच होतंय आजकाल. आपणच थोडं शांत होऊन नवीन काहीतरी करायला पाहिजे.
तो त्याच्या विचारात, इशाचा अजूनही काही मेसेज कसा आला नाही. तिचं काम झालं असेल कदाचीत. जाऊदे आपणही आज काहीतरी नवीन करू, चित्र काढायला घेऊ का? नाहीतर पिक्चर पाहत बसू…
तिने कपडे काढून केस मोकळे करून असल्या नसल्या टेंशनला दूर करून केसांवरून गरम पाण्याचा मग ओतला. अंगभर पसरलेल्या त्या गरम ऊर्जेने बाहेरच्या पावसाला आणि वादळाच्या धोक्याला दूर लोटून तिला कुशीत घेतल्यासारखे केलं. ती त्याच फ्लो मध्ये केस धुवत राहिली.
इकडे याच्या बॅकग्राऊंडला गाण्यांच्या म्युजिकसह तिच्या बाथरूममधून खाली पडणाऱ्या पाण्याचे थेंब तार जुळवू लागले…
पण क्षणाचा वेळ न जाता
ती तार ताडकन तुटली, याला करंट बसल्यासारख झालं आणि भेग पडलेल्या त्या भिंतीचा तुकडा पडून जमिनीवर पडला…
तो थरथरला.
तिने कामवाल्या ताईला आवाज देऊन विचारलं, काय ग सुमा काय झालं कसला आवाज? तिने उत्तर दिलं नाही. ती कदाचित काम आवरून निघूनही गेली होती.
तो भानावर येत नव्हता. त्याला कळलंच नाही अचानक हे काय घडलं. तिला त्या ‘वेळी’ बघून तो मनाला घेऊन एका कप्प्यात शांत झाला, लाजत राहिला, कोवळा पाला थेंब अंगावर पडल्यावर शहारावा इतका तो अचंबित झाला. वादळाची भीती कधीच दूर पडली, जेव्हा त्याच्यासमोर त्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा कुण्या स्त्रीला अर्धनग्न ओल्या केसांत पाहिलं.

तिच्या ओल्या केसांचा गंध त्याच्या स्वप्नातल्या फॅन्टसीच्या गोधडीला गोंजारत राहिला, तिने अलगद तिच्या केसांवरून चेहऱ्यावर पाण्याचा मग ओतला तसा त्याचा जीव खाली वर होत राहिला… त्या केसांवरून कपाळावर आणि कपाळावरून चेहर्याखाली पडणाऱ्या पाण्याच्या धारा त्याला उंचावरून पडणाऱ्या धबधब्यासारख्या भासू लागल्या. तिच्या अर्ध नग्न भागांना त्या उंचावरून पडलेल्या पाण्याचा तसूभरही त्रास होऊ नये म्हणून त्याचा हात पुढे सरसावत होता. तिच्या चेहऱ्यावरून मानेत आणि नंतर स्तनात अडकलेल्या पाण्याने भरगच्च वाहणाऱ्या नद्यांची नागमोडी वळणं त्याला समुद्र बनून कुशीत घ्यावी वाटत होती. ती अजाण होती, तिला कल्पना नव्हती हे वादळ तिचं बाथरूम पाडून आत शिरलं आहे. तो एकटक तिच्याकडे केवळ बघतच होता, उतावीळ नव्हता, ना कुठलाच हापापलेपणा. तो निव्वळ न्याहाळत होता. शेजारच्या घरांमधून येणाऱ्या भांड्यांच्या आवाजात त्याच्या मनात शेर घुटमळत होता,
तुम कहां मोहब्बत के बारे में कुछ जानती हो,
हैं हिम्मत तो आंखें खोल कर बताओ कैसी होती है मोहब्बत।
रेडिओची धून तुटत तुटत ऐकू येत होती.
याने नजरेने केलेला मुका संभोग कल्पनेतून बाहेर पडणार होता… दहा मिनिटे न्याहाळून तो तिच्या जवळ जाण्यास खुर्चीतून उठला. पण त्या आधी घाने थोडं खिडकीबाहेर डोकावून खिडकीचा पडदा सरकन ओढला, खिडक्या घट्ट बंद केल्या. खिडक्या बंद केल्या, दोघांच्या लज्जेपोटी.
त्याच्या हालचालींमध्ये घाई आली होती, डोक्यात ठरवलेलं करून पुढे काय करायचं या विचारात तो तिच्या स्नानगृहाकडे दबक्या पावलांनी पुढे जात होता. तोच त्याचा श्वास अडकला कारण तिने अचानक डोळे उघडून त्याच्याकडे पहिलं. पहिल्यांदाच चोरी करताना नेमकं ऐन मोक्याला पकडलं जावं, तेव्हा चोराची होते तशी त्याची अवस्था झाली होती.
ती त्याच्याकडे बघतच राहिली.
ती जर ओरडली असती तर हा पावलांची उलट दिशा ठरवून बसलेला होता. पण तिने कदाचित हे सगळं कधीतरी स्वप्न म्हणून पाहील होतं, ते आज तिच्यासमोर उभे असल्यासारखे तिचे भाव होते. तो पाहत होता, तिचा चेहरा त्रिकोणी होता म्हणून त्याला तिच्यात चंद्र दिसला नाही. त्याने सगळ्या कवी वर्गाला वेडं ठरवून टाकलं, पण मग ती हसून लाजली नि, तिच्या त्या हसण्यात त्याला चंद्रकोरीत विसंबलेला चंद्र दिसला …
नि कानावर बोल पडले, चांद आँखो में आया आधी रात को… त्याच्याही डोळ्यात चंद्रकोर आली होती. कितीतरी वेळ बघत राहिल्यानंतर त्यानेच लाजून शरमेने खाली पाहिलं. तिला त्या ‘वेळी’ नि तसं बघून तो लाजला जरी असला तरी त्याच्या कल्पनेतली पहिली स्त्री त्याच्यासमोर होती. तो मनात तिच्या शरीरावर हक्क जमवून बसला होता.
त्याने तिच्या नकळत ती केसांवरून पाणी टाकताना अलगद स्वतःचा चेहरा पुढे करून पाण्याला त्याच्या चेहऱ्यावर झेललं होतं, त्याच्या तशा पुढे जाण्याने तो तिच्या स्तनांच्या चिमूटभर लांब होता. तो वादळाने वारा सरकत यावा त्या वेगाने तिच्या जवळ गेला, त्यांच्यात कणभर अंतर उरलं नाही. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं होतं. तिच्या अंगावर सांडलेले काही दवबिंदू अधिकच एकमेकांच्या कुशीत शिरून उष्ण उबेची मागणी करू लागले. हा मोह दोघांना सुटेनासा झाला होता, वादळाच्या धक्क्यात त्या दोघांना बसलेला हा धक्का मुलायम होता, कापसाने पाणी शोषून घ्यावं तसा कापूस बनून तो तिच्यात मिसळत चालला होता.
तिने वाऱ्याच्या थंड उबेतून सुटका करून घेण्यासाठी त्याच्या बाहुंना पकडत त्याच्या मिठीत शिरायला सुरुवात केली होती, तितक्यात त्याला त्या स्वप्न कथेतून जाग आली. आपण हे काय करतोय म्हणत तो वीज चमकावी तसा भानावर आला. त्यावेळी त्याला, मोहाला बळी पडून झालेला संभोग आणि व्यसनातून झालेला संभोग हे दोन्ही एका पानावरचे दोन भाग वाटले. तेव्हा त्याने माघार घेतली. नात्यांच्या नैतिक मूल्यांच्या पुढे त्याने शारीरिक अकर्षणाला दूर सारलं.
त्याला नातं कमवायच होतं. ही कमाई दोन्ही बाजूंनी झाली तरच तो प्रत्यक्षात पुन्हा तिच्या शरीराला मिठीत घेणार होता, कुठल्या वादळाला घाबरून न जाता समुद्र होऊन कुशीत घेणार होतो.
त्याच्या पटकन मागे सरकल्याने तीही शुद्धीत आली होती. प्रेमापेक्षा शरीराच्या संभोगाची नशा अधिक घातक ठरते, तिला जाणवलं होतं.
वातावरणाला नॉर्मल करत रेडिओला साद देत दोघांनी मान्य केलं, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे इक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा!
ती कपडे घालेपर्यंत तो तसाच पाठमोऱ्या तिला न्याहाळत राहिला.
तिच्या पाठमोऱ्या वळणाकृती कागदावर किती असंख्य चित्र त्याला दिसत होते. तिच्या आत चाललेलं वादळ त्याला नग्न आकृतीत स्पष्ट दिसत होतं. त्याला लागलीच रंगाचा ब्रश घेऊन त्यांना ठळक करावं वाटत होतं, पण तिच्या हक्काच्या गोष्टीवर तो हक्क सांगणार नव्हता.
त्याने तिला स्पर्शही न करता नवं वादळ थोपवलं होतं. काही पुरुष सामर्थ्यवान आणि क्षण जपणारे असतात…
वादळाची वाट पाहणाऱ्यांपेक्षा त्यांना थोपवून समुद्र बनून प्रलयाला कुशीत घेणारे…
ती त्याला कपडे घातलेले असूनही पारदर्शकपणे न्याहाळत राहिली. पडलेल्या भिंतीचे तुकडे उचलून ती जागा स्वच्छ करणाऱ्या त्याच्यात तिला समुद्राचा भास झाला… ती या समुद्रात वादळ बनून मिसळायला तयार झाली होती, नैसर्गिकपणे …!
खूप सुंदर….
काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाहीये…
लिहत रहा…!
खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुझ्या लिखाणात तू भेटलीस…
मला तर संपूर्ण फेसबुकवर इतके सुंदर लिखाण वाचायला भेटत नाही…👌👌💖💖
एक वेगळाच अनुभव येतो लेख वाचताना, थेट लेखातल्या कॅरॅक्टर मध्ये स्वतःला पाहायला सुरुवात करतो मी तर 😍
Means a lot to me 😍… खूप दिवसांनी या प्रकारातले लिखाण केले. प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. 🙂