प्रेम चेहरा नाहीये…

प्रेम कुठला चेहरा नाही,
त्याला आकार नाहीये,
ते एखाद्या वर्तुळात बंदिस्त होईल अशी गोष्ट नाहीये,
ना कुठल्या शब्दांत बसेल अशी बंदिश आहे…

तुम्ही प्रेमात पडला तेव्हाचा क्षण आठवून पहा… त्या व्यक्तीचा चेहरा पाहून तुम्ही प्रेमात पडला? कुठल्या विश्वासाने, कोणत्या भावनेने त्याच्या एकदम जवळ गेलात? जिथे फक्त श्वासांची जागा होती. तो विश्वास, ती भावना इतर कुणाच्या बाबतीत का वाटली नाही?
पण प्रेमात पडायला एकच क्षण लागला? की हळूहळू आवडत गेलं त्याचं अस्तित्व? अस्तित्व, ज्याला कसलाच आकार नाहीये. प्रेमासारखंच… एखाद्यावर प्रेम होणं म्हणजे त्याच्या अस्तित्वाला स्पर्श करून आपण त्याच्या जवळ जातो. प्रेमाइतकं आपण कुठल्याच व्यक्तीला एवढं जवळून पाहत नाही. कारण प्रेमात माणूस समोरच्याच्या अस्तित्वाच्या जवळ जातो.

प्रेमाला आणि अस्तित्वाला चेहरा नाहीये. पण दोघेही एकमेकांचे आरसे आहेत. तुम्ही प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या जवळ जाताना तुम्हाला जे जाणवतं ते अस्तित्व. जे इतर कुणाच्या जवळ जाऊन जाणवत नाही… या जगात डोळे, कान, नाक, तोंड सगळ्यांना सारखं आहे… पण तीच व्यक्ती इतकी गरजेची का असते? अशी व्यक्ती जिचं मनही आपल्याला दिसत नसतं… आपण केवळ अंदाज बांधत असतो. पण एक दिवस त्या व्यक्तीला तुमचं आणि तुम्हाला त्याच्या अस्तित्वाचा स्पर्श होतो, आणि हळूहळू तुमची उत्सुकता वाढत जाते. फिर प्यार तो होना ही था!

– पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

1 thought on “प्रेम चेहरा नाहीये…”

  1. प्रेमाला शब्द चेहरा – व्याख्याच नाही मान्य.
    शब्दात ते व्यक्त होणारच नाही.
    फार सुंदर अनुभव आहे तो आयुष्यातला.
    जो एकदाच येतो.
    ते फक्त अनुभवाचे मनसोक्त.
    छानशी आठवण आयुष्यभराची.
    व्यक्त होणं आणि व्यक्तित्व स्वीकारण बऱ्याच पद्धती हो प्रेमाच्या.
    कधी तरी तुमच्यामुळे जागी होतात आठवणी.
    Last msg from her
    “Life is a short
    World is small
    But love is
    Greater than all…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *