बूकशेल्फातलं प्रेम…

  • by

एकदा एका बूकशेल्फातून एक बूक उचललं…
पुस्तक जड होतं त्यामुळे हात खाली वाकला गेला.
घागर हलकी असेल म्हणून उचलायला जाऊन जसा तो भार त्या हातावर येतो तसंच काहीसं झालं….
तरी ते पुस्तक निवडलं मी,‌ कारण मला त्याला एक रसिक वाचक देऊन सार्थकी लावायचं होतं.
म्हणून त्याला वाचलं, अनुभवलं, कल्पना करून अनेकानेक गोष्टी बदलायचा प्रयत्नही केला.
सॉरी विसरले, ते पुस्तक ‘तू’ होतास हे सांगायचंच विसरले.
ते पुस्तक न पेलवणारं वाटलं असताना,
हट्ट म्हणून का होईना, आपल्यातल्या नात्याला ‘प्रेम’ म्हणणार होते नं मी, तुझ्या हट्टापोटी…
पण तुझा संयम ढासळून तू सहज दुसऱ्या वाचकाकडे गेलास, संपूर्णपणे दुसऱ्या शेल्फात …
काही पुस्तकं फक्त अनुभवण्यासाठी असतात नंतर ते बूकशेल्फातच शोभून दिसतात, कुणाच्याही हातात…
पण वाचनं गरजेचं होतं.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *