प्रेमाचा सुर्यान्ह!

  • by

कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी माझ्यासाठी प्रेम मागितलं असेल,
तू माझ्या आयुष्यात येणं हा काय योगायोग नसेल!

मला तुझ्या नसण्यापासून असण्यापर्यंत सगळच अनुत्तरीत करतं,
कुणी सोबत नसूनही असल्यासारखंच प्रेम कसं रे करतं?

तू मलाही न विचारता मला तुझी करून घेतोस,
तरीही आयुष्याच्या धोक्याच्या दिवशी कसं कोण प्रेमाचा इजहार करतं?

तू, मी आणि मी, तू खूप झालं, आता नातं एकमेकांत मिसळलय,
त्या शब्दांसह अस्तित्व नि आयुष्यातली ती मधली स्पेस भरून केवळ  तुमि उरलय!

काय वेगळं आपल्यात घडलं? जगासारखं अन् जगासमोर प्रेम घडलं!
तरी ते प्रेम तुझं माझ्याकडे नि माझं तुझ्याकडे यथायोग्य सुपूर्द झालं.

सुरुवात, मध्यान्ह प्रेमाचा झालाय, मला शेवटाची घाई नाही!
तरीही,
तरीही… तुझ्या संगतीनं उरणार मी शेवटास!
त्या शेवटच्या श्वासाचा प्रवास होत असताना,
“प्रेमाला उधळून देऊन एका संपूर्ण आयुष्याची जपणूक झाली, हे जगाला ओरडून दाखवायला मी उरणार शेवटास!

प्रेमाच्या काठावर तुमि उरणार शेवटच्या श्वासाला आत झेलताना,
आयुष्याचा मावळतीचा शेवटचा सूर्य, शेवटचा तुझा स्पर्श, हातात हात आणि ओठांवर ओठ ठेवून,
चंद्र पाकळी सूर्याच्या डोक्यावर विराजमान होताना,
मी पाहील, ते पहिलं नि शेवटचं, कुठलंही परिसीमा गाठून सहस्त्र युगे उरणारं प्रेम!

तो सुर्यान्ह कितीतरी निष्पाप उरेल, जिथे म्हातारं होऊन निर्मोही जीवनात कसलाच मोह नसेल!
उरेल ती काळोखाची मृत्यूरात्र,
आपल्यासह आपल्या प्रेमाला गिळून घेणारी,
शेवटी लाहीलाही होईल वस्त्रांसकट अंगाची,
तेव्हा गळून पडेल प्रेमाचं बीज, तिथेच पुन्हा कित्येक वर्षे प्रेम विखुरले जाण्यासाठी!
आपलं प्रेम आपण नसल्यावरही उरण्यासाठी!

या ओळींचा शेवट मला असाच हवाय,
इतकाच खरा आणि शेवटास जाणारा!
साथ देशील, तुमिचा सूर्यान्हा पर्यंतची?

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *