मी- आज तरी एकटा येणारेस ….?
तो- हं…
मी- चॉकलेट नको आणुस यावेळी… हृदयातल्या प्रेमाला उगाच भरती यायला होते. मग क्षणभंगुर त्या चॉकलेटच्या कागदावर ‘प्रेम संपेल …?, नाही संपणार…?’ अशी भोळसट रेखांश उमटतात..
तो- हं …..
मी – फुलांचा गुच्छ तर आणुच नकोस … मागल्या वेळी आणला होतास… काय खूष झाले होते म्हणून सांगू … मग तुझी चिट्ठी वाचली ‘बहोत प्यारी लग रहीं हो आज। बट आई हॅव टु गो बेबी… अर्जंट काम हैं।….’ त्यामुळे फुलांचा गुच्छ नकोच, उगाच दुसऱ्या सकाळी ती कोमेजलेली फुलं पाहून प्रेमासारख्या पवित्र भावनेला पुसटसा वास यायला लागतो …
तो हम्म…
मी- आवलीला सोबत आणलंस तर तिच्या प्रियकरालाही आण… म्हणजे तेव्हासारखं मी बाजूला, माझ्या शेजारी ती आणि तिच्या अगदीच बाजूला तु असं बसणं होणार नाही. नाही रे… काहीही काय… तुझ्यावर कसा संशय घेईल मी?
पण म्हटलं उगाच गैरसमज नको ना, त्या ब्राह्मणाचा. तो आवली नि तिला पाहून म्हटला नव्हता का, ”अगदी राधाकृष्णेचा जोडा दिसतोय, अडचणी आहेत, पण शुभकार्य होईल लवकरच. काळजी नसावी” वगैरे …
ऐ, नाहीतर एक काम करूयात का? …. मी येतच नाही तुम्ही दोघे भेटा आणि हो … हे मस्तय !… अरे पण तुम्ही ऑफीसमध्ये असतातच ना एकत्र? …. ओह्ह .. ओफ् कोर्स मी समजुच शकते.. काहीही काय?
तो- तुम क्या कह रही हो? मैं कुछ कहूं ?
मी- अरे ! नको आज नको … पुन्हा तेच ते … तु बरणीला झाकण लावणार, मी उघडणार, बघणार, पुन्हा विश्वास ठेवणार …. ब्लाह ब्लाह ब्लाह … बट यु क्नो व्हाट, तसं बघितलं तर आजसुद्धा ‘तिचा हात तुझ्या हातात आहे आणि माझं डोकं तुझ्या खांद्यावर’
राधा होणं जमतं कित्येकींना, राधा आहे माहीत असूनही रुक्मिणी होणं मूर्खपणाचे वाटते मला.
कारण कृष्ण हा राधेच्या प्रेमामुळे श्रेष्ठ मी कधी मानणारच नाही.
क्योंकि “बदनाम हो गई मिन्नतों की रुक्मिणी,
मुझे वैसे कृष्ण की आशा नहीं है।”
आजची दुनिया कृष्णाची दिवानी आहे, नाही म्हणत म्हणत कृष्णाच्या पिढीने कधीच त्याच्या नि राधाच्या नात्याला स्वीकारलं नाही. पण माझी पिढी मोठ्या जिगरीपणाने हे प्रेम स्वीकारते आहे. स्वीकारते म्हणते पण त्यांना इथे राधा कृष्णाच्या प्रेमात भरडली गेलेली रुक्मिणी दिसत का नाही ?
राधेला अल्पकाळ असेल पण प्रेमाचा शृंगार अनुभवायला मिळाला, कृष्णाने बाकी बायकांसोबत नाती आयुष्यभर पूर्णवेळासाठी निभावली. स्त्रियांच्या रक्षणासाठी त्या स्त्रियांशी लग्न केले, असा संदर्भ आहे. “त्याचं प्रेम राधा असलं तरी त्याने कर्तव्य निवडले” या वाक्याला कुणी न्याय द्यावा? भावनेशिवाय निभावलेल कर्तव्य परकेपणाची निराशा देतं. रुक्मिणी बरोबर इतर बायकांनी ही निराशेची लग्न अशीच निभावत रहावी का? त्या काळी रुक्मिणी सत्यभामा सगळ्यांनाच कृष्ण देव वाटला, त्यात गैर काहीच नव्हतं. पण या काळात कृष्ण होणं आणि त्याला आताच्या काळात बायकांनी स्वीकारणं मला परावलंबी वाटतं. तो कृष्ण खरंच तेव्हा आणि आजही बरोबर आहे?
मी- सो सोरी …. मैं तो भूल ही गयी थी | तुम्हें मराठी कहाँ समझती है।… हां … तो क्या केह रहे थे आप ?.
तो- अरे तुम ही कुछ मिन्नतों की रुक्मिणी, राधा कृष्ण बोल रही थी। छोड़ो, क्या समझना वो सब। आइ ॲम सो सोरी बेबी …. अब्बी ऑफिस से फोन आया था… आइ हॅव टु गो… और ये लो तुम्हारा फेव्हरेट चॉकलेट।
हैपी चॉकलेट डे माय ब्यूटीफुल चॉकलेट। हमेशा साथ रहना, और खुश भी।
मी -सिर्फ एक बार कह पाते,
चलो एक काम करते है।
‘तुम्हारा गुस्सा और मेरी मीटिंग एक बक्से में बंद करते है। ‘
फिर बात करेंगे |
तो शायद चॉकलेट जैसी कहानी ख़त्म ना होती।