एकमेकांपासून डिसकनेक्ट…

  • by

आदल्या दिवशी क्लोज झालेले,
हृद्याजवळची दुःख वाटलेले,
डोळ्यातल्या अश्रूंना बांध दिलेले,
सुखाचे मेजर क्षण जगलेले,
न चिघळता जखमा वाटून घेतलेले,
‘आपला माणूस’ कॅटेगरीत टाकण्याचा विचार करत असणारे लोक दुसऱ्याच दिवशी अचानक अनोळखी होऊन जातात…

असं एकेक करत एक दिवस सगळेच डिसकनेक्ट होत जातात.
मोठं होताना एकतर आपला मूड नसतो आणि जेव्हा आपला असतो तेव्हा समोरच्याचा नसतो.
हे चक्र खूप वाढत चाललं आहे.
कधी आपल्या नोकरीत प्रॉब्लेम, कधी त्याच्या घरात प्रॉब्लेम…
कधी आपला स्ट्रेस, कधी त्याचं डिप्रेशन…
असं करत करत एकाच वेळी दोघांचं एकमेकांसाठी भेटणं तसा दुर्मिळच योग…
त्यामुळेच रोज होणाऱ्या भेटीगाठी फक्त औपचारिकता आणि योगायोग…

एकमेकांच्या मनाची वेळ मेळ खात नाही, त्यामुळे उरतो तो तोंडावर आल्यामुळे होणारा संवाद…
©पूजा ढेरिंगे

#disconnecttoselfconnect #oldNote

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *