वादा हैं।

  • by

“सो? काय प्रॉमिस हवं सांग?” मी विचारलं
“करणार खरंच ?” तो ठरवूनच आलेला होता अशा अविर्भावात म्हणाला.
“अरे सांगून तर बघ …”
“आपल्या नात्याचा ‘भूतकाळ’ होणार नाही इतकंच वचन दे मला …” तो इमोशनल होऊन बोलला.
“एवढंच ना … ? चल दिलं… ” त्याने मागितलेल्या प्रॉमिसला मी सहज प्रतिसाद दिला.

आता तुझा टर्न …

“बोल.. काय प्रॉमिस करू तुला?” तो म्हणाला.
“तेरे से नहीं होगा पता है |… त्यामुळे सोड…” मी त्याने हट्टाने पुन्हा विचारावं म्हणून म्हटलं.
“अरे ! असं नाहीये… बोलके तो देख…”
“अच्छा ठीके सांगते…लेकिन एक नहीं खूब सारे है| “
“अरे तू मांगके तो देख | तुमसे किये वादे पुरे करेंगे इतने आमिर तो है हम| ” तो दिमाखात बोलला
“ओहके तर्र तू मला वेळ द्यायचा, शॉपिंगला सोबत यायचं, तुझ्या आयुष्यात माझी प्राइयारिटी पहिली ठेवायची, मित्रांमध्ये असतानाही मला रिस्पेक्ट द्यायचा, तुला काही खटकलं माझ्यात तर तेही न अडखळता सांगायचस… हा आत्तासाठी एवढंच”
“श्या ! एवढंच ना…. ठीके, आय प्रॉमिस असंच होईल.”

अशाप्रकारे आपल्यातही प्रॉमिसेसची देवाणघेवाण झाली होतीच नं… दोघांनीही ‘एवढंच ना’ म्हणत सहज वचनं दिलीही होती ….
पण या एवढ्या सगळ्या प्रॉमिसेसमध्ये एक प्रॉमिस मागायचं विसरले मी, त्यामुळे सगळा मिनार कोसळला …
‘खरं बोलण्याचं’ प्रॉमिस….
हे प्रॉमिस मागणं मलाही तेव्हा गरजेचं नव्हतं वाटलं. पण आत्ता त्याबद्दल रिग्रेट होतोय.
कारण ‘खरं’ बोलण्याच्या व्याख्या ह्या आजकाल इतक्या बदलल्या कि त्यांची एहमियतही कमी झालीय.
वरच्या सगळ्या प्रॉमिसेसला रिप्लेस करून ‘खरं बोल आयुष्यभर’ एवढं एकच प्रॉमिस मागायला हवं होतं, सगळं जोडलेलं राहिलं असतं, नाही.
ए, पण त्यामुळे तू तुझी प्रॉमिसेसशेवटपर्यंत पाळले हं, मी माझं प्रॉमिस तोडलं, नातंही तुटलं.
तेव्हा मजाकमध्ये घेतलं पण आत्त्ता कळतंय,
ये बड़ीछोटी चीजे अपने रिश्ते की बुनियाद पक्की कर देते है|
शुरुवात में हलकेसे लगनेवाले अल्फाज बाद में रिश्ता जोड़े रखने में एहम काम करते है|

आधार मला तुझा होता, आधार मीही तुझा झाले होते,
आपली ‘वचनं’ चुकली, म्हणून तुटलो आपण बहुदा!

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *