गुपित गुपितच ठेवूया!

  • by

कुठल्यातरी थेंबाशी माझी हितगुज होते.
तुला सांगायचे म्हणत सर भिजवून जाते…

तू माझ्यातल्या ओल्या पारदर्शी वस्त्रातल्या स्त्रीला न्याहाळून फुलवितो,
तुझ्या डोळ्यांचा आरसा मला तीठ लाऊन जातो…

तरीही कुठे तो थेंब सापडत नाही,
मी त्याला सांगितलेलं हितगुज तो सांगून फुटणार तर नाही.?

बावरी मी वेडी होत जाऊन ही अशी चूक करून जाते,
मी माझं त्याच्यावरचं समुद्रभर प्रेम थेंब भर पाण्याला कशी सांगून जाते?

तरी थेंब का सांगेल त्याला?
पण थेंबाचा का काही भरोसा देता येईल?
कुठे लपला असेल माझं गुपित घेऊन ?
का विरघळला असेल कुठल्या दोन जीवांच्या रोमँटिक पावसात?
ते तस्स झालं तरी एकवेळ चालेल.
म्हणजे, प्रेमाला प्रेमाच्या थेंबाचा चिअर्स होईल…
हुश अस झाल तर खरंच किती ते बरं होईल…

माझ्या त्या थेंबाच्या शोधात मी हा चक्क समोर हे विसरूनच जाते…
आणि हाही मला बघण्याच्या नादात मी समोर आहे हेच विसरलेला असतो…
त्याला आवाज देऊनही त्याची नजर काही सरकत नाही, त्याच्या हाताला हलवून जागं करण्यात मौज वाटली असती खरी, पण …

इश्य!
झाsssलं…
तरी म्हटलं, हल्ली याच्या ओल्या केसांतून उडणाऱ्या शिंतोड्यांवर इतकं बेफाम का हे प्रेम जडलंय मला.?
इतका वेळ शोधात असलेल्या माझा गुपिताचा थेंब त्या केसातल्या दवात अडकून बसला असतो…
नि अशातच त्याने केस झटक्याने मोकळे करण्याचा क्षण येतो, त्याच्या नजरेसह त्याच्या केसांना अलगद आहे तिथे दाबत मी आमचं एकमेकांच प्रेम गुपितासवे बंद करते….
कदाचित अशाच कित्येक पावसांसाठी…

अशा प्रत्येक थेंबात जेव्हा हे प्रेम साठेल, तेव्हा एकच मुसळधार पाऊस पडेल, त्या पावसाच्या प्रत्येक थेंबातून प्रेम बरसेल, त्या दिवसापर्यंत हे गुपित जपायचं! फुलू द्यायचं! मोठं होऊ द्यायचं! ठरलं होतं!

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *