“स्वप्न जगायची तर स्वप्न पाहावी लागतात” याच आशेवर नकारात्मक विचार येऊ लागले की त्याला पर्याय म्हणून स्वप्नांत वाढ करायची.
त्याच आशेवर रामोजी फिल्मसिटीमधला अनप्लॅन्ड अनुभव वाट्याला आला. सिनेमाचं वेड असणाऱ्यांना रामोजी निव्वळ स्वप्नवत वाटणार ही खात्री आहे. कारण लहानपणापासून जे चित्रपट पडद्यावर पाहिलेले असतात त्याचं वास्तव आणि त्यामागचे मोठमोठे सेट्स प्रत्यक्षात पाहणं ही कल्पना सुद्धा वेड लावणारी आहे. ही चित्रनगरी हैदराबादेत १६०० एकरात विस्तारलेली असून खरंच एखाद्या सिनेवर्ल्डप्रमाणे आहे. तिथे गेल्यावर आम्हाला जाणवलं की एक चित्रपट उभा करायचा म्हणजे खायचं काम नाही. येथे अनेक दाक्षिणात्य सिनेमे, हॉलिवुड सिनेमे कमी खर्चात शूट केले जातात. अनेकदा भव्य दिव्य वाटणारी दृश्य खूप कमी जागा आणि साधने वापरून चित्रित केली जातात.
सूर्यवंशममधली बच्चन साबची हवेली, हम दिल दे चुके सनमच्यावेळी ऐश्वर्या सलमानचा सीन, दिलवाले, बाहुबली, दृश्यम २ पोलीस स्टेशनमध्ये गाडलेले प्रेत, रोहित शेट्टीच्या सर्व गाड्या, फॉरेन सिटीचा सेट, बस स्टॉपचा सीन या आणि अशा अनेक चित्रपटांचे सेट कशाप्रकारे तयार केले जातात, याचे लॉजिकल चित्रण पाहणं डीप अनुभव आहे. लहानपण डोळ्यासमोरून जाते, तरुण वयातले सुखावणारे, हृद्याजवळचे सिनेमातले दृश्य डोळ्यासमोरून जातात. आताच पाहिलेले सिंघम, दृष्यम २ वेगळ्या अँगलने समजू लागतात.
ही सगळी माहिती देत असताना जेव्हा तो गाईड म्हणतो की आपल्याकडे कमी जागेत एकावेळी अनेक मल्टीपर्पज सेट्स उभारतात. उदाहरणार्थ, एका बाजूला मस्जिद, एका बाजूला मंदिर!
एका बाजूला दवाखाना, एका बाजूला जेल!
एका बाजूला मोठाच्या मोठा राजवाडा, दुसऱ्या बाजूला मुंबईची चाळ!
एका बाजूला विमानतळ, एका बाजूला रेल्वे स्टेशन!
ही तफावत आपल्या भारतीय विविधतेतील जगण्याची तफावत इथे सिनेमाच्या सेटवर पाहायला मिळते. त्याचे व्हिडिओज लवकरच पोस्ट करेल.
तसेच बऱ्याचदा सिनेमा मेकर खेड्यातले खडबडीत रस्ते दाखवण्यासाठी पक्क्या डांबरी रस्त्यावर दगडं, रेती, माती टाकून त्याला खालीवर केलं जातं.
जो दिखता हैं, वहीं बिकता हैं! हे सिनेमांनी दिलेलं सूत्र सिनेमाच्या या करामती आणि युक्त्या पाहून पटू लागतं. हे सेट इतके खत्तरनाक खरे बनवलेले असतात की, त्याची सुबकता, डिटेलिंग पाहून हे नेमके सेट आहे की खरचं ती जागा आहे अशी शंका सुद्धा येत नाही.
या महिना अखेरपर्यंत महिला दिनानिमित्त सर्व महिलांना बाय वन गेट वन फ्रीची ऑफर सुरू आहे. त्यामुळे एका तिकीटाला एरवी टॅक्स मिळून १५०० रुपयांचा खर्च येतो. तेवढ्यात २ महिला किंवा महिलांचा मोठ्ठा ग्रुप मस्त जगावेगळी ट्रीप करू शकतो.
पूजा ढेरिंगे
फोटोज् :






- पूजा ढेरिंगे