हवं ते मिळे या पुस्तकांमध्ये!

  • by

सध्याची तरुणाई क्षणाला प्रेमात पडून क्षणात ब्रेकअपच्या वळणावर जाणारी आहे. त्यामुळे काहीवेळेला हे ब्रेकअप्स डिप्रेशन, इन्सोम्निया हे आजार या तरूण मनाला ग्रासतात आणि आयुष्य नव्याने सुरु होण्याच्या वळणावरच त्यांच्या मनात आयुष्याबद्दल आकस निर्माण करतात.

अशा वातावरणात वाढत असताना गेल्या आठवड्यात नेहमीच्या डेली रुटीनला बाजूला सारून मी ‘वेरोनिका डिसाइड्स टू डाई’ हे पाउलो कोयलोंचे पुस्तक वाचायला घेतले …

मी अशी पुस्तकी किडा म्हणतात तशी बुकोहोलिक अज्जिबात नाही… पण या पुस्तकाच्या नावाने मी आकर्षित झाले … पहिल्या पानावरच कुणीतरी मरत आहे हे वाचूनच मनातल्या कुतूहलाने हे पुस्तक वाचायचंच ठरवलं.
पुस्तकाची कथा काहीशी अशी की, एक २४ वर्षाची स्लोवेनियन मुलगी वेरोनिका आत्महत्येचा प्रयत्न करते. तिची आत्महत्येची कारणे सुरुवातीला जरा जास्तच बालिश वाटतात पण तिचा तो प्रवास नवखणन्यासारखा असतो.
या कथेला मी यामुळेही जोडले गेले कारण आपल्याही आयुष्यात प्रोब्लेम्स असतात म्हणून कधीतरी आपल्याही मनात नकळत का होईना आत्महत्येचा विचार येऊन जातो … पण सुदैवाने तो विचार वेरोनिकासारखा टोकाचा नसतो … तिच्या आत्महत्येमागचे कारण आहे की “तिच्या आयुष्यात सगळं ठराविक पध्दतीने घडणार आहे…त्यामुळे तिच्या लेखी जगण्याला काही अर्थच नाहीये. मग का जगावं?” हा प्रश्न तिच्यासमोर उभा असतो त्यामुळे तारुण्य, सौंदर्य, श्रीमंती, असं परफेक्ट आयुष्य तिच्या समोर असतानाही ती झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते …
म्हणजे उदाहरणार्थ; लग्नाआधी नवरा खूप प्रेम करणार मग लग्न होणार, त्यानंतर ते ३-४ वर्षे प्रेम असेल मग हळूहळू प्रेम कमी होणार मग ती गरोदर होणार त्यामुळे तो पुन्हा प्रेम करायला लागणार, मग बाळ झाले की त्याचा इन्टरेस्ट पुन्हा कमी होत जाणार. मग एक दिवस तिला त्याच्यावर संशय येणार मग ती ओघाने त्याचा मोबाईल चेक करणार.. त्याने वाद वाढणार, टोकाला जाणार आणि मग घटस्फोट …. !!!!
हीच गोष्ट करियरबाबतीतही घडणार ….
त्यामुळे मग शेवटी ती या ठरावीकपणातून निरोप घ्यायचे ठरवते …
मग त्यानंतर जे घडते, तिचा तो आत्महत्येच्या प्रयत्नांनंतर तिचा वेड्यांच्या इस्पितळापासून ‘आझाद’ होण्याचा तो प्रवास आपल्याला वेडं करून टाकतो ..
तिथे त्या वेड्यांच्या यादीत तिला भेटलेले मेरी, झेदका, एड्वार्ड, डॉक्टर आयगर हे सगळे ‘नमुने’ असतात… प्रत्येकाचे पात्र आपले स्वतःचे आयुष्य सहज सांगून जाते… आणि शेवटी तिची भेट होते एड्वार्डबरोबर, तो एक स्किझोफ्रेनिया पेशंट असतो … तेव्हा त्यांच्या भेटीत जे जे घडत जाते ते फक्त आणि फक्त कल्पना करण्यासारखे असत. म्हणजे एखादा परिच्छेद वाचावा आणि डोळे झाकून त्याची फक्त कल्पना करावी इतकं ते नातं सुंदर असतं. त्यामुळे त्यांच्या त्या निनावी नात्यात एड्वार्ड प्रियकर म्हणून जवळचा वाटतो, तितकीच वेरोनिकाही एक प्रेयसी म्हणून आपली वाटायला लागते. आपल्याकडे विचार करायला वेळ उरत नाही. आपण नकळत वाचता वाचता त्या वेड्यांच्या इस्पितळात पोहोचलेलो असतो एक वेडा, एक पेशंट किंवा मग खुद्द वेरोनिका बनूनच….


“या पुस्तकामुळे, वेडं होणं हे खरं जगणं आहे हे जेव्हा कळतं तेव्हा खरंच वेडं राहून जगणं किती जिवंतपणाचं आहे ते कळत जातं.. आणि त्यामुळे हे पुस्तक संपल्यानंतर त्याचा असर म्हणू किंवा काय पण आयुष्यातील काही गोष्टी ठरावीक नसाव्यात असं वाटून जाते आणि आयुष्याची काही बंधने झुगारून स्वतःचे वेगळे आयुष्य निर्माण करण्याचे धाडस अंगी येते.”


तीन बैठकीत पूर्ण केलेली ‘वेरोनिका’ आयुष्य किंचित का होइना एज्जी करणारी वाटली….
कुठलेही पान उघडावे आणि काहीतरी आजच्यासाठी वेचून घ्यावे अशी ही पाउलो कोयलोंची पुस्तके आहेत.. याआधी एकाच लेखकाची सगळी पुस्तके वाचावी असे नाही वाटले कधीच. पण ‘दि अल्केमिस्ट’नंतर या पुस्तकाने स्वतःला वाचायला बोलावले…
आंतरिक शांतता आणि स्वतःच नवे जग निर्माण करणे म्हणजे वाचन…
खरेच,
“जे जे आंतरिक सुख हवं ते ते मिळे या पुस्तकांमधी…”
म्हणूनच आज मनापासून वाटते की, तरुणाईने वळावेच वाचनाकडे …..

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *