आणि जर का आपला सगळा शृंगार झाल्यानंतर पाऊस आला तर ??
तो गाडी घेऊन घराबाहेर उभा होता…
गर्द लाल रंगाची साडी, त्याला बांधणीचे घुंगरू, साडीला काळे काठ, ब्लाउज स्लीव्हलेस काळ्या रंगाचा, ओठांना लाल लिप्स्टीक गालावर लाली, बारीक नाजुकशी टिकली खास त्याला आवडते म्हणून… आणि या सगळ्या साजश्रुंगारानंतरच पाऊस बरसायला लागला तर ?
तर काही नाही …
त्या पावसाला अज्जिबात न जुमानता मी छत्री घेऊन त्याला तशीच भेटायला गेले .. त्याच्या हातात कॅमेरा होता, तो आधीच काहीतरी करत होता त्यात, तितक्यात त्याने नकळत लेन्सचा फोकस माझ्याकडे केला आणि माझा तो चिडचिडेपणा, अदा टिपल्या … आणि माझा राग… उफ्फ… त्या रागालाही विडीओत कैद केलं ..
“आपल्या चिडण्याचाही उत्सव व्हावा यापेक्षा वेगळं काय हवं होतं …” माझं सगळं बोलणं, खरतर चिडणं झाल्यानंतर मी गाडीवर बसायला लागले.
त्याने तसाच हात घट्ट पकडला, गाडी स्टॅन्डवर लावली. माझ्याकडे एकही कटाक्ष न टाकता एका फिल्मप्रमाणे तो एका हिरोसारखं त्याच्या हिरोइनला घेऊन जायला लागला…
मी त्याच्याकडेच बघत होते … पावसात ओला झाल्यामुळे तो भलताच क्युट आणि आकर्षित दिसत होता … खास करुन त्याची ती खळी …
उफ्फ !!! जान बसती है उसमें मेरी…. घरी पोहोचल्यामुळे तिथे त्याला बघण्याचा कार्यक्रम संपला…
मला खाली उतरवलं, कुलूप उघडलं. पुन्हां दोन्ही हातांनी मला उचललं आणि तेही माझ्या मेकअपला अजिबात धक्का न लावता … आणि सोफ्यावर बसवलं… आणि तो असा समोर बसला…खरंतर मी दुसरीकडे बघणं अपेक्षित होतं त्याला, पण मला त्याच्या डोळ्यातच बघायचं होतं, माझं सुंदर सजलेलं आयुष्य त्यात मला दिसत होतं. आणि अचानक मी माझ्या विचारांतून बाहेर पडून त्याला पाहू लागले. त्याच्या त्या सगळ्या हालचालींना पारखत होते, तो केवढा ब्लश करत होता, पहिल्यांदा कोण्या मुलाला ब्लश करताना पाहत होते…
एका पॉईंटला तर माझं बघणं अति झालं म्हणून तो म्हटला, ‘चल कॉफी बनवतो तुझ्यासाठी, खास माझ्या हातची …’
तो जायला लागला, मी घट्ट त्याचा हात पकडला. त्या ओल्या सफेद शर्टामध्ये तो काय दिसत होता… पारदर्शक, मादक म्हटले तर माझ्या स्वभावात बसणार नाही पण त्याच्या तशा असण्याला नाकारु शकत नव्हते … त्याचा मागून पकडलेल्या हाताला तसंच पुढे करत त्याच्या कमरेला विळखा घालत त्याला मीठीत न घेता त्याच्या पायांवर पाय ठेवत त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या श्वासांच्या इतक जवळ गेले की आमचे श्वास वेगवेगळे उरलेच नाही. मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केले…
त्याने स्वतःला माझ्या हातून सोडवत, विषय बदलावा तसं आधीचे ते सगळे फोटो विडीओ दाखवायला सुरुवात केली आणि त्याच्या नकळत मी आमचं ‘लग जा गले’ लावलं…ते माझ्यापेक्षा त्याच जास्त फेवरेट होतं आणि मी मुद्दाम लावलं होत. कारण अशावेळी त्याने फोटो काढल्यामुळे मला थोडा रागच आला होता, राग आल्याचं भासवून मी त्याला खोडकरपणे मारायलाच लागले की पुन्हा त्याची ती खळी दिसली… त्या खळीत अडकलेल्या त्या थेंबाने मी त्याच्याकडे पुन्हा खेचली जावून त्याच्या गालाच मनसोक्त चुंबन घेतलं …
त्याने हात पकडून मला स्तब्द केलं, “”क्या हुआ है तुझे ? तू वेडी आहेस का ? चुकून माझ्याकडून काहीतरी होऊन जाईल त्यापेक्षा तु दुर रहा ना, कारण तू आज भयंकर सुंदर, अप्सरा नाही ते चीजी वाटेल पण गझल दिसतेयस … चांद म्हणून तुझ्या सौंदर्याला कैद करणार नाही कारण आज कुठलीच उपमा तुझ्या सौंदर्याला कैद करु शकणार नाही आणि ते केस जरा बांध ना … आणि तुझा हा राग ना घनदाट मोहक आहे ..त्याला काबूत ठेव. माहिते तुला ? तुझ्या सौंदर्याच्या आधी तुझा हा राग माझं प्रेम आहे .. आणि म्हणून हा आजचा पाऊस पडतोय, मला पुन्हापुन्हा तुझ्या प्रेमात पाडण्यासाठी… ” “मला तुझ्या शब्दांच्या मालिका नको आहेत… फक्त तुझी ती टभूरी खळी हवी आहे आणि तुझी मीठी उउम्म आणि संपूर्ण तू कुठल्याही बंधनाविना… नाहीतर तू निघ लगेच.” कैक घटकेपासून ताटकळत राहिलेल्या माझ्या ओठांना फक्त तो हवा होता. त्यामुळे मी सभ्यपणाचा आव आणणं टाळलंच ….पावसावर संताप, त्यांनतर त्याच्या अशा वागण्यावर संताप म्हणून मी गळ्यातला हार आणि ती लिपस्टिक पुसत पुसत आतमधल्या खोलीत निघाले. आणि तो म्हणाला,
“अल्फाज नहीं ग़ज़ल हो तुम,मेरे वजूद से पूरी हो तुम|
आधे में मुझे छोड़ जाए ऐसी कहां हो तुम,क्योंकि खुद से ज़्यादा मेरी हो तुम| “
हिरोइन नाराज होऊन जावी आणि हिरोने तिला मनवावं अशा अधीर सुरात म्हणत म्हणत तो पुढचा एकही क्षण न दवडता माझ्या जवळ आला. माझे हार्टबीट हजाराच्या गतीत वाढत चालले होते, स्वतःला कुठल्याच मर्यादा न लावता त्याने मला जवळ ओढलं, मीठीत घेतलं, इतकं घट्ट की माझ्या स्तनांचा त्याच्या छातीला स्पर्श झाला… सिक्सपॅकचा तो पुरुष त्याच्या स्पर्शाने भलताच वेगळा आणि फक्त माझा उरला होता. त्याने मिठीतच अलगद माझ्या ओठांवर त्याचे ओठ जमवले.
तो स्पर्श स्वर्गानुभुती मिळावी इतका शुद्ध होता.
मी डोळे मिटले, माझ्या स्पंदनांनी त्याला इजाजत दिली. श्वास थांबत नव्हते, शब्द गोंधळले होते. माझे श्वास घटकांघटका वाढत होते, त्यांचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत होता. कित्येक दिवसांच्या विरहानंतर प्रियकराने विळखा घालावा तिला, तसं त्याने मला जवळ खेचून सर्वांगाच चुंबन घेतलं, तो उपभोग भलतच सुख देणारा तृप्त करणारा होता… आम्ही इतके दिर्घ होत गेलो हळूहळू शांत झालो … आणि शेवटी हळूच त्याने कपाळावर एक मऊ चुंबन देउन तो क्षण माझ्यानावे केला… आमचं ते भांडण आमच्या नात्यातला पहिला शरीराक्षण देऊन गेला, ते भांडण कुठल्या कुठे गेलं पण भांडणातलं किस्स हा इतका अनोखा असतो ते त्या दिवशी कळलं.