मन मंदिराच्या सुखासाठी, घर मंदिरात लावला मोगरा होता,
खुडून कुणी नेले फुल देवाला, तिथे सुगंध सांडला होता…
एकाने फुल तोडले, पण तो सुगंध सगळ्यांत वाटला गेला… त्यामुळे सांगते, चांगल्या गोष्टी करता जा रे स्वतःसाठी, त्याचा फायदा दुसऱ्या कुणालातरी होईल. जसं गाणी ऐकताना तुमच्या बरोबर तिर्हाइत कुणीतरी गाण्याचे बोल ऐकत असतो, मोठ्याने पुस्तक वाचताना त्यातला विचार कुणाचंतरी आयुष्याचं कोडं सोडविणारा ठरतो, स्वतःच्या समाधानासाठी केलेली मदत तिसऱ्या कुणालातरी फायद्याची ठरते, एखाद्याला दिलेला सकारात्मक सल्ला तो पुढे जाऊन तिसऱ्या कुणालातरी देतो, आकर्षक दिसण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करून स्वतःला खुश करता, त्यातून तिसऱ्या कुणाच्या तरी पाकिटात पैसे जातात, स्वतःच्या यशासाठी नोकरी करता, त्यातून कंपनी अन् घराची चूल पेटते, तुम्ही आतुन सकारात्मक आणि खुश राहता तेव्हा त्याचा फायदा तुमच्या घरच्यांना होऊन घरातील वातावरण समाधानी रहातं, तुम्ही स्वतःसाठी जे जे करता त्यातून दुसऱ्या कुणाचा तरी फायदा होतो आणि त्या फायद्यातून जे सुख आणि समाधान त्या व्यक्तीला लाभलेलं असतं, त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी केलेली गोष्ट तुम्हाला सुद्धा परमात्मिक आनंद देणारी ठरते! कारण जे जे आपण करतो ते ते आपल्याकडे पुन्हा परत येतं. Do good get good!