एकटा नाही तो, त्यामुळे आभाळाला कधी भेग पडत नाही…
आभाळातला काळोख पाहून वाटते,
ना निजायला हात त्याला कुणाचा लागतो, ना त्याचा दिवा मालवायला कुणी लागतं…
एकांतातल्या अपूर्णतेत संपूर्ण तो…
त्याच्यात चंद्राची पणती सुखात नांदते, सूर्यातला पुरुष साैंदर्य लेऊन निजतो…
रात्रीचा आधार त्याला निजवत जातो, सूर्याची तिरीप जागवत जाते, असंख्य चांदण्याची रिंगणं त्याच्या भोवती वावरता…
माणसानं ही इतकंच स्वतंत्र राहावं, इर्द गिर्द फिरणारी दुनिया येऊन निघून जाईल…
पण, आसमंत होण्याचा अट्टाहास नि बळ व्हावं लागतं!
अन् त्यासाठी काळोखात मिरवाव लागतं नि सुर्यात तळपावंही लागतं…
ही स्वतःत मिरवण्याची नशा त्याच्यात आहे…
अन् म्हणूनच आभाळाला या भेग पडत नाही…
Lines- grabbed by – पूजा ढेरिंगे
Please follow and like us: