सिनेसृष्टीवर राज्य करणारी अभिनेत्री स्मिता पाटील !

शाश्वत सुंदर डोळे, सावळा रंग, नजरेत ठामपणा आणि त्या सावळ्या रंगावर चमकणारी तेजस्वी सुंदरता या वर्णनाला स्मिता पाटील हे नाव पूर्णविराम देणारं आहे.

“जेव्हा मी मरेल तेव्हा माझ्या देहाला नववधूसारखे सजवूनच अंत्यविधी करायचे” अशी इच्छा या सौंदर्याच्या राणीने तिच्या मृत्युआधी मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांना बोलून दाखवली. दुर्दैवाने ते करावही लागले. केवळ दहा वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल ८० फिल्म करून स्वतःच्या करीयरच्या स्वरूपात स्वतःची छबी निर्माण करून आज चौरेचाळीस वर्षानंतरही एखाद्या व्यक्तीचे कुतूहल निर्माण होते ते व्यक्तिमत्व म्हणजे स्मिता पाटील.

३१ वर्षाचा काळ म्हणजे करियरमध्ये सेटल होऊन आपल्या जोडीदारासह रंगवलेली स्वप्न पाहण्याचा काळ पण त्याच काळात मृत्यूशी तिची भेट होणं हे धक्कादायकच होतं.

म्हणतात, मोर मेल्याचं दुःख नसतं, समाज सौंदर्याला मुकतो, याची आठवण म्हणजे स्मिताचं दृष्ट लागावी इतकं चोख रूप…

दुसऱ्या कुणी प्रियकराने ओघात नि अतिशयोक्तीने त्याच्या प्रेयसीला म्हणावं चंद्र पण स्मिताला जेव्हा प्रसिद्ध राज बब्बर चंद्राची उपमा देत असतील तेव्हा त्यांना डोळे झाकून मी सलाम करेल.

असं म्हणतात, १९५५ मध्ये स्मिता जेव्हा जन्मली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, हे पाहून पुण्यात जन्मलेल्या त्या हसऱ्या मुलीचं नाव स्मिता ठेवण्यात आलं.

स्मिताने सोळाव्या वर्षी करियरची सुरुवात मुंबई येथील दूरदर्शन येथे निवेदिका म्हणून केली.

या काळात स्मिताची भेट सिने दिग्दर्शक बेनेगल यांच्याशी झाली.

श्याम बेनेगल यांनी स्मितामधील अभिनेत्रीची खुबी पाहून तिला चरणदास चोर या चित्रपटात छोटे पात्र करण्याची संधी दिली.
करीयरच्या मेहनतीच्या टप्प्यात स्मिताची ओळख राज बब्बर यांच्याशी झाली. स्मिता आणि विवाहित राज बब्बर यांचे ‘ भिगी पलके’ या सिनेमाच्या वेळी झालेल्या भेटीतून एकमेकांवर गहिरे प्रेम जडले होते. स्मिताच्या सौंदर्याने आणि प्रेमाने राज बब्बर इतके घायाळ झाले होते की त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेम विवाहित बायको नादिराला सोडून ऐन ऐंशीच्या मागासलेल्या काळात स्मिताबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून स्मिता बरोबर दुसरे लग्न केले. याकाळात बब्बर यांचे एक्स्ट्रा मरिटेल अफेअर म्हणून स्मिताला खूप लोकांच्या वाईट शब्दांना आणि नजरांना सामोरे जावे लागले. स्मिताची आई समाजसेविका असल्यामुळे तिचाही या लग्नाला विरोध होता.

वैयक्तिक आयुष्यातील या चढा ओढीत स्मिताने करियरकडे दुर्लक्ष केले नाही. तिने पुढे अनेक सिनेमातून चार- पाच वर्षातच बेस्ट अभिनेत्रीचा नॅशनल अवॉर्ड जिंकला आणि १९८५ ला स्मिता पाटील यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
या दरम्यानच २८ नोव्हेंबर १९८६ रोजी स्मिताने प्रतीक बब्बर या मुलाला जन्म दिला. परंतु मुलाच्या जन्मानंतर सततच्या आजारामुळे स्मिता नेहमी दवाखान्यात राहू लागली. वायरल इन्फेक्शनमधून तिला ब्रेन इन्फेक्शन झाले परंतु निदान न झाल्यामुळे तिच्या अवयवांतील ताकद कमजोर होत चालली होती, शेवटी १३ डिसेंबर १९८६ ला सौंदर्याची परिभाषा म्हणवणाऱ्या स्मिताने हे जग सोडले.

असे म्हटले जाते की, स्मिताच्या मृत्यूनंतरही तिच्या १४ फिल्म्स प्रदर्शित झाल्या. स्मिताच्या कारकिर्दीत तिने ‘भूमिका, मंथन, मंडी, मिर्च मसाला, नमक हलाल, शक्ती’ या चित्रपटामध्ये काम केले.

स्मिताबद्दल अभिमानाची बाब म्हणजे स्मिताने मराठी आणि हिंदीत ८० फिल्म्स केल्या. एकतीस वर्षाच्या कालावधीत एवढ्या मनांवर राज्य करणं आणि अजूनही येणाऱ्या माझ्यासारख्या कित्येक पिढ्यांना तिच्या रूपानं भाळवणे मोजक्या लोकांना जमतं.

पण या सगळ्यात माझी आणि स्मिता पाटीलची भेट म्हणजे जेव्हा जैत रे जैत मधलं ‘मी कात टाकली’ गाण्याची गुणगुण कानी पडली तेव्हा. ओठ हलू लागले पण पहिल्यांदा पाहत असलेल्या त्या व्हिडिओवरून नजर हटत नाही. त्या काळात हे सावळ्या रंगाचं रसायन सहजगत्या इंडस्ट्रीमध्ये वावरते काय नि लोक सहज तिच्या रांगासह तिला स्वीकारता काय? त्या काळात जमलेला हा भाव आज का कुणास जमत नाही. ती जादू त्या सावळ्या रांगावरील सौंदर्याची होती की स्मिताची होती. पण मराठी चित्रपट सृष्टीत ऐंशीच्या दशकात अनेक सावळ्या रंगांनी मादक पण कणखर व्यक्तिरेखांनी प्रेक्षक मनावर राज्य केले.

पुण्याला सन्मान नि अभिमानाने सांगण्यासाठी स्मिता पाटील हेही नाव आहेच, हे आज तिच्या संग्रहित आठवणीतून उमगले.

Please follow and like us:
error

3 thoughts on “सिनेसृष्टीवर राज्य करणारी अभिनेत्री स्मिता पाटील !”

  1. I don’t even know how I ended up here, but I thought this
    post was good. I do not know who you are but definitely you are going to a famous blogger if you
    are not already 😉 Cheers!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *