संघर्षाचं टॉनिक

  • by

माणूस खरंतर खडतर आयुष्यात जगणारा आणि त्यात रमणारा प्राणी आहे. एक काळ आठवा जर तुम्ही आयुष्याच्या सुरुवातीला खूप मेहनत केली आहे, दोन वेळच्या जेवणासाठी, डोक्यावरच्या छपरासाठी झुरत असाल आणि त्याचं फळ म्हणून आता तुम्ही एसी रूममध्ये बसून लॅपटॉपवर काम करताय. या दोन्ही काळांमध्ये परिस्थितीचा रोल खूप मोठा आहे. पण त्याचबरोबर समांतर चालणाऱ्या ‘संघर्षाचा’ रोलही तेवढ्याच ताकदीचा आहे. पहिल्या काळात रमलेले आपण मनाशीच म्हणत राहतो, तेव्हा संघर्ष होता पण मी कित्ती आनंदी आणि समाधानी होतो. आता सगळ्या सुख सोयी पायाशी लोळण घालत आहे, तरी मनात कुठल्याच गोष्टीचा ओलावा नाहीये.
मी नेहमी विचार करते, मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या मुलांना जगण्याचे “होप्स” (उमेद) कशातून मिळत असेल? अमिताभ बच्चनच्या घरात जन्म घेणारा अभिषेक जन्मतः श्रीमंतीत जन्माला आला. त्याचं आयुष्य त्याने खूप सहज आणि उच्च जीवनशैलीत घालवलं. मग तरीही त्याला ही मेहनत करण्याची उमेद कुठून मिळाली? त्याचं आयुष्य ऐश्वर्याचा नवरा आणि अमिताभचा मुलगा या दोन नात्यांमुळे अधोरेखित करणारा आपला समाज आहे. कुठून त्याला अभिनय करावा, बिझिनेस करून संपत्तीला वाढवावं आणि काहीतरी करत राहावं हे वाटलं?
यात मग शाहरुखचा आर्यनसुद्धा एक आयुष्य मांडतो. त्याने आयुष्य इतकं जगलंच नाही ज्यात त्याला आयुष्याची समज यावी. त्यातले फायदे तोटे, योग्य अयोग्य कळावे. समज बोलण्यातून येण्यापेक्षा अनुभवातून आली की माणूस शहाणा होतो. त्याचं सराउंडिंगच इतकं लिमिटेड असल्यामुळे त्याच्यापर्यंत गरीब, कष्टाळू जग वास्तवात असतं हे कदाचित पोहोचलं नसेलही. मी यात कुणाचं समर्थन करण्याचा प्रयत्न करत नाही. पण ही दोन्ही आयुष्य तुलना करावी अशी आहेत. यांच्या आयुष्याचा पॅटर्न जरी नेपो स्टार म्हणून असला तरी त्यातून बरच काही शिकता येतं. सगळं असूनही कष्ट करण्याची इच्छा आणि सगळं असल्यामुळे काहीच न करण्याचा ऍटीट्युड आयुष्यातल्या संघर्षाचे दोन अर्थ सांगतात.


माझी अशी अजिबात धारणा नाही की माणसाने डॉंकी वर्क करून आयुष्य संघर्षात व्यतीत करावं पण माणसाला नीट नेटक्या, चकचकीत ठिकाणी धार येतच नाही. कुणी मला विचारलं की, माणसाची उमेद कुठून निर्माण होते तर मी सांगेल संघर्षातून! त्याला कुठेतरी अडचणीत टाकल्याशिवाय तो जागचा हलत नाही. हे टॉनिक आहे. प्रत्येकाने  नाकारलं तरीही. Because when you’re about to die, you give your best shot. म्हणजेच जेव्हा तुम्ही मरणाच्या दारात उभे असतात तेव्हाच तुम्ही तुमचं आतापर्यंतचं सगळ्यात बेस्ट वर्जन दाखवतात. म्हणून कुठल्याही माणसाचं मरण आणि त्यावेळचा संवाद लक्षात राहतो.


काहीजणांना खूप सोपी आयुष्य मिळतात. सोपी म्हणजे मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा न लागणारी. पण तरीही त्यांना जगताना अडचणी या असतातच. कारण ज्याच्या जे वाट्याला आलं ते शिकून त्यात कंफर्टेबल होण्यात त्याचं स्ट्रगल सुरू असतं. समजा तुम्ही कुठल्यातरी महान व्यक्तीच्या घरी जन्माला आले तर तुमचं प्रेशर, तुमचे आव्हानं ही वेगळी असणार. तोही एक प्रकारे स्ट्रगलचाच भाग आहे. अर्थात तीन वेळची भाकरी मिळण्याच्या संघर्षाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. कारण एका ठिकाणी करू नये हा पर्याय सुद्धा असतो आणि दुसरीकडे करावंच लागतं. पण संघर्षातून वाखाणण्याजोगे अनेक हिरे मिळाले. कारण संघर्ष माणसाचं पुढे जात राहण्याचं मोटिवेशन असतं. Everyone is playing their role very effectively. Just learn from them and add it in your struggle. It’ll automatically reflect in your success 🌻

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *