दिवस उजाडतो,तसा तो मावळतोही …
सूर्य उगवतो,चंद्रही मला बघून जातो….
चांदणी त्या ओघात मला चमकण्याचं सौंदर्य दाखवते….
आणि अशीच एक हिवाळी लुसलुशीत संध्याकाळ मला बोलतं करते.
‘व्यक्ती आहेस, व्यक्त हो! ‘ म्हणून खुणावते नि जन्माला घालते नवी उमेद.
फक्त या वाक्यावर.
की,
“बघ त्या समुद्राला ! या गहिऱ्या सागराच्या गर्भात तुला वेदनांचा अंशही नाही जाणवणार,
का माहिते ?
कारण, त्याचं हास्य त्याच्या वेदनांपेक्षा जास्त खळखळाट आणि नितळ आहे ! …..
त्यामुळे तुझ्या हास्याला इतकं प्रगल्भ नि इतकं विशाsssल बनवं कि दुःखाला ओशाळून जावंच लागेल !
शेवटी,तुझं आयुष्य तुझ्या मनाच्या फिलॉसॉफीवर जगणारे,प्राधान्य हास्याला दिलंस तर कदाचित प्रत्येक संध्याकाळ माझ्यासारख्या सौंदर्यवतीबरोबर घालवशील …. सांगते नशीबवान होशील ! “
आणि या घनघोर विचारांसरशी ती लुप्त होते,माझ्या ओसाड आयुष्याला तिच्या मावळतीच्या छटांच न विरणारं हास्य देऊन….

Please follow and like us: