जेव्हा मनाला बंद करून मनाची कवाडं घट्ट मिटून दोन्ही मनांतून एक बंड पुकारला जातो, तेव्हा लग्नाचा ज्वालामुखी त्या दोन्ही मनांच्या भावणांमध्ये कित्येक स्वप्नांच्या चिथळ्या उडवून टाकतो…
सैरभैर मन संपूर्ण मंडपात प्रियकर प्रेयसीच्या ओढीत अडकून जाते … लग्न सावरायला सगळेच असतात, तिच्या अन त्याच्या मनातलं दुःख सावरायला कुणीच उरत नाही…
तेव्हा तो तिच्यात तिला तर ती त्याच्यात त्याला शोधत असते …
प्रवास त्यांचा सावळा हा पहिल्या रात्री सुरू झाला, उसासे ना पलंगा बाहेर सांडले ना शब्द एकमेकांबाहेर…
कारण शेवटी तो तिच्यात तिला तर ती त्याच्यात त्याला शोधत राहिली…
Please follow and like us:
Bharich