मी – तू जाणार आहेस, कळलं ….
तो – हो, २ महिने आहेत अजून…
मी – अच्छा …
तो काहीच बोलला नाही. मला काही बोलायचंच नव्हतं.
मी – ओके बाय ..
तो – बाय
एव्हाना त्यालाही हि ओव्हरऍक्टिंग वाटली असेल. बिअर, विस्की, वोडका, वाईन, यापेक्षाही त्याच प्रेम जास्त अल्कोहोलिक होत. त्याला २ महिने मी त्याच्या मनासारखं करायला हवं होत. पण त्याला याचा अंदाजही नव्हता, या दोन महिन्यात होत्याच नव्हतं होऊन जाईल,पुन्हा मी त्याची होईल आयुष्यभरासाठी , नि नेहमीसारख तो निघून गेलेला असेल अश्रूंच्या ओंजळीत मला एकटीला सोडून. आमचं प्रेम हे असं होऊन बसलंय, कि तो जात असेल तरी मी त्याला थांबवू शकणार नाही, मग नेहमीसारखच काळोख , दोन दिवसांचं स्वप्न जगूण पुन्हा आधीच्या वाटेवर.
त्याने मेसेज केला. “भेटू शकतेस ?.. म्हणजे तुला वेळ आहे ?”
काय मेसेज करावा म्हणून थोड्या फिरकीच्या मूडमध्ये मी रिप्लाय केला “कुणाचा नंबर आहे ? कळू शकेल ?”
आई गगग, २ मिनिट झाली… ४ झाली…. ५ झाली … पण तरीही रिप्लाय नाही?
चिडला असेल का ? रडका कांदा..
फायनली त्याचा रिप्लाय आला, “तुला माहीत आहे बाळा.भेटू उद्या ! “
आता खरा विचारांचा खेळ सुरु झाला, झक्कास कॉम्बिनेशन असतं हे , प्रेम आपण करायचं, त्रासही आपणच करून घ्यायचा नि मग पुन्हा प्रेम मिळवण्यासाठी धडपडायचंही आपणच.खुऊप मोठा दिवस होता.
घड्याळाचे काटे तर जसे थंडीने गारठले होते, एकाच जागी षंढासारखे धम्म उभे होते .
नाही नाही घड्याळ बंद पडलं नव्हतं ,माझी पापणीची उघडझाप उशिरा होत होती. जीव भरून आला होता नि ती धडधड मला जखडून ठेवत होती त्याच्या आधीच्या गोष्टींनी, म्हणजे नक्की काय प्रश्न असतील नि काय उत्तर देऊ …? मी काही विचारल तर तो काय म्हणेल ? त्याला विचारून टाकू का सरळ ,कारण काय होत विभक्त होण्याचं ? .. नको…उगाच उतावीळ होतेय असं वाटेल ते…
आधी अगदीच सोप्प असायच, सगळ कळायच,. पण आता….? मी स्वतःला प्रिपेर करत होते, त्या गोष्टी पुन्हा होऊ नये म्हणून, पण काय अर्थ असेल सगळ संपल्यानंतर भेटण्याचा ….?
तस मी विचार करायला नाही पाहिजे ना ? म्हणजे सगळी गलती त्याने करायची पण टेन्शन मी घ्यायच, सगळ्या रात्री याच्या नावावर करायच्या मी , पण याला काय? याचा खेळ चांगला होता ‘एक कुलुप दोन चाव्या.’
भेटायच्या आदल्या दिवशीची मैफिल, उठण्या बसण्यात खाण्या पिण्यात नि ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर उद्याची मीटिंग रंगवण्यातच गेली. माझ इंग्लीशच ग्रॅमर थांबल होत, मराठीचे शब्द वळत नव्हते …
चकारा मारुन डोक्याने ठेका धरला होता, पण उत्तर मिळत नव्हत की भेटायच का आहे? डोक प्रचंड धरल होत, विचारांच्या कलहात पहाट कधी झाली कळलंच नाही ….नेहमीप्रमाणे उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला, त्याचा मेसेज आलेला होता, हो… त्याचा मेसेज आला होता. वॉsssव काय भयानक फीलिंग असत हे. सूर्याने उधळलेल्या रंगाहुनही जास्त मी गुब्बु गुलाबी झाले होते, गुदगुल्या होत होत्या, आधीचे दिवस आठवून खुश होत होते, नि आज रमा काकांनाही गोड स्माईल देत होते, पहिल्यांदाच एक प्रश्न स्वतःला विचारात होते, आपली ख़ुशी, आपला आनंद नि आपलं हसणंसुद्धा कुणाच्यातरी हातात असत ? ते काही असो ! मला आद्धी तो मेसेज बघायचा होता.
रोज माझ्याशी हेकेखोरपणे वागणारी सकाळ … आज मीसुद्धा तिच्या नाकावर टिच्चून, डोळ्यात डोळे घालून बघत होते नि सांगत होते , “बघ, मेसेज आलाय त्याचा आणि आज मलाही हक्क आहे लालगुलाबी होऊन लाजण्याचा.” पण तरीही कुठेतरी वाटत होत ‘कुछ बात तो जरूर है।ऐसेही ये इतनी मोहब्बत नहीं बरसा सकता।‘ डोळे लपलपत असतानाही क्षणाचा वेळ न घेता मी मेसेज बघितला “चेक युअर पार्सल ….”
चटदिशी उठले, केस सावरले, अंथरूणातुन धापदिशी उडी टाकली …आईई गग्ग पडणारच होते , पण आईनी धरल , अरे देवा ! .. लग गयी …. “जीभ चावत मी म्हटल”
काय? कुठे सकाळी सकाळी ? ”आईनी प्रश्न केला”
आता तिला कुठे सांगू तुझ्या न होणार्या जावयाच पार्सल आलय.
तिला ‘ऐ आई,आज जाऊ दे ना गं!` अर्जंट ए …’ म्हणून कशीतरी लाडीगोडी लावून पुढे जातच होते तर,
‘काय चिमने, त्याचच पर्सेल आलय नं ?घरी येऊन जा… त्याला म्हणावं’ आई म्हणाली .
आई शप्पथ, हिला कस कळल ……..?
ताइइइई ………, आज तू गयी .
ए, मरु दे !… ताईला नंतर बघीन……. आधी पार्सल…
पार्सल …. पार्सल .. रामू काका चाय बादमें , पार्सल कहाँ है ?
रामुकाका ……… पार्सल , पार्सल कुठय ? रामउऊऊऊऊऊउ काका ……
अशी ताणताण चिडचिड होत होती कि बस्सच.
अरे वाह! सकाळी सकाळी मस्तच गाणी लागतात कि रेडिओला, ‘मेरा दिल भी कितना पागल है’ चालू होत लेकिन, इस बार मुझे इजाजत नहीं थी प्यार करने की. म्हणून पुन्हा पार्सलच्या मागे लागले, एकदाच पार्सल हातात आलं, पहिलं लव्हलेटर यावं नि ते बघण्याची उत्सुकता शिगेला जावी, इतक्या उत्सुकतेने मी ते पार्सल उघडलं, जीवात जीव आणून डोळे विस्फारून काय असेल मधे ? या आतुरतेने मी उघडत होते.
‘ओ माssssssय गॉssssड ….. माइ फेवरेट ब्लॅक ड्रेस, ब्लॅक इअरिंग्स अँड रेड लिपस्टिक अँड अ नोट , सगळं बाजूला ठेवून आद्धी चिट्ठी उघडली;
“शुभ प्रभात महाराणी, आम्हास अगदीच कल्पना आहे, कि तुमचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल परंतु तुमची आज्ञा असेल तर आम्हास तुमची सेवा करण्याची अजून एक संधी मिळाली असती तर खुप बरे वाटले असते… ठीके बाबा मुद्द्याच बोलतो, कारण मला माहीत आहे नाक टमाटरसारखं लाल झालं असेल नि रागाचा फुगा काय फुटणार नाही इतक्यात.
तर मुद्द्दा हा कि माझ्या आयुष्यातील खूप अनपेक्षित दिवस आहेआजचा म्हणजे आज मी जगातल्या सगळ्यात सुंदर परीला भेटणार आहे, खूप एक्साइटेड आहे मी खुऊप, मला माहिती आहे तू आता विश्वास ठेवणार नाही माझ्यावर, खूप चुका केल्या आहेत मी,पण एवढ्या संधी दिल्या, एक शेवटची संधी दे प्लिज आणि हां एक रिक्वेस्ट आहे “फक्त एकच कर , आज माझी बनुन ये, एकदम अनोळखी भेटू , विसरून जा सगळं आजच्या दिवसापुरतं , मला माहित आहे इट साऊंड्स रब्बीश, पण प्लीज माझ्यासाठी , नको माझ्यासाठी पण आपल्या प्रेमाखातर …प्लीज “
खरंच होत त्याच , एवढ्या दिवसात तर हाश्शह्ह .. मीही थकले होते ही रोजची लपाछुपी खेळून, लेट्स टेक अ ब्रेक
‘मोहब्बत के राह पे बहोत से हसीं नगमे जुड़ेंगे, बिखरेंगे। तेय आपको करना है की कौनसा दिल आपके लिए धड़कता है॥ और इसी हसीन दास्ताँ के साथ एक हसीन नगमा आपके लिये फ्रॉम रॉकी हँडसम ‘
‘ले आई है बीते हुए लम्हों को फिर हाँ ये ज़िन्दगी’
तसल्ली देते कि रडवतेय हि, आजच या आरजेला हे इमोशनल गाण लावायच होत ? जले पे नमक छिडक रही थी, ये भी ।
गाणं एन्जॉय कर प्लिन्सेस,डोंट थिंक अबाउट दि लिरिक्स …..
खूप दिवसांनी मी खुलले होते, तोच आधीच्या दिवसांचा रंग आज पुन्हा एकदा उजळला होता, चहाऐवजी कॉफी घेतली,आईला मिठी मारली, ,त्याने दिलेला ड्रेस घातला ,त्याच्या आवडीचा पर्फ्युम लावला,आरशात बघून लाजले मुरडले गाणं गुणगुणलं.
एवढ्या दिवस जे काही विचार करून गोष्टी ठरवल्या होत्या विसरून गेले सगळं नि आम्ही भेटलो.
त्याच बसमध्ये,जिथे आम्ही खऱ्या अर्थाने प्रेमात पडलो होतो.
दोन कुलूप नि एक चावी ?
मी – हे तुलाच जमू शकतं … खर सांगू तर मी कद्धीच तुला बोलणार नव्हते ,पण तू बोलायला भाग पाडलं. ‘एका कुलुपाला एक चावी’ हे किती सोप्प , साजेस नि योग्य समीकरण आहे , पण नाही… आपल्याला पटेल तरशप्पथ ! कूल डूड हां ….
तो- काही प्रॉब्लेम आहे का ?
मी- तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ?
तो – नाही … म्हणजे तुम्ही अशी डझनभर चिडचिड करत आहात नं , म्हणून विचारलं
मी – म्हणजे आता मी माझी वयक्तिक बोलूही शकत नाही का ? तुम्हाला प्रॉब्लेम आहे , उठा नि दुसऱ्या सीटवर बसा ना. मोदीने यावर तर बंदी नाही ना आणलीये ? तुम्हा पुरुषांचा हाच मोठ्ठा प्रॉब्लेम असतो. मुलगी रडलीदे खांदा, मुलगी रडली दे खांदा … अरे काय ?
तो- एक्सक्यूज मी ! हे अति होतंय हां तुमचं ….
मी – का ? काही चुकीचं बोलले मी ? तोही तसाच नि तुम्हीही नि तो समोरच्या सीटवरचा गण्याही तसाच… नाही नाही …अजिबात नाही हां …तुमची अज्जिबात चूक नाहीये , उणिवा त्रुटी काय त्या आमच्यातच, तुम्ही तरपुरुष आहात मग तुमच्याकडून चुका कशा होणार ?
तो- नाही….. मी ते आपलं माणुसकी म्हणून जरा… विचारलं.
आमच्या सुरुवातीच्या भेटीतले क्षण पुन्हा जगत होतो आम्ही, पण मला काही गप्प बसवेच ना मी विचारूनच टाकलं
मी -हि माणुसकी मला कधी दाखवली का रे ? बाहेरच्या मुलींवरच काय ते प्रेम उफाळून येत तुझं
तो -हि काय भानगड आहे आधी मला स्पष्ट सांग. म्हणजे तू न माझे कॉल घेतेय, ना मेसेजला रिप्लाय करतेय , सारखं एकच एक कुलूप नि दोन चाव्या.
मी- राधिकाबद्दल बोलतेय मी. तू कुलूप मी चावी नि तुझी दुसरी चावी राधिका .आता लगेच चिडून मैत्री आहे आमच्यात वगैरे म्हणूच नकोस प्लिज मी बघितलंय तुला, तिला खांदा देताना .
तो -सगळं ठरवूनच आली आहेस तर,मी काही स्पष्टीकरण नाही देणार.
तितक्यात त्याने कल्प्याला फोन केला ..
मी- ए हॅलो, त्याला कशाला आपल्यामध्ये आणतोय ?
कल्प्याने फोन उचलला नि त्यानंतर जे मला कळलं ते खूप अनपेक्षित होत.
राधिका. माझी जवळची मैत्रीण, हि कल्प्याची गर्लफ्रेंड होती, हे मला माहित नव्हतं. नि त्यांच्यात झालेला वाद मिटवण्यासाठी हा राधिकाला समजावत होता, पण त्यासगळ्यामध्ये आमच्यात टोकाचे गैरसमज वाढवून आम्ही वेगळे झालो.
कल्प्याने फोन ठेवला; मी आनंदी होती नि थोडी ओशाळलेहि होते. नात्यात गैरसमजाला जागा दिली,त्यामुळे हे होणारच होत कारण अविश्वास असेल तिथे नातं काय टिकणार, नको नको ते बोलले त्याला, पण त्याने पुढाकार घेतला, त्याच्या एका निराळ्या मेसेज,पार्सल आणि डेटने आम्ही पुन्हा एकत्र आलो.
या सगळ्यातुन एक गोष्ट छोटी पण आयुष्यभरासाठी शिकले, नातं कोणतही असो, तिथे गैरसमजाला थारा देऊ नको. कारण जो आपल्याला सहा(6) दिसतो , तो नऊ(9)सुद्धा असू शकतो, आणि जर गैरसमजाच अस्तित्व असेलच तर ते नातंच जपू नकोस
मग जरा लाजतबुरजत, चाचरतच मनापासून एक सॉरी म्हटलं,त्यानेही सॉरी म्हटलं आणि अशाप्रकारे दोघेही सिनेमातल्या रोमँटिक सिनसारखे विरघळून गेलो एकमेकांच्या मिठीत.
सहा ला नऊ दिसण्यासाठी पण उलटे व्हावं लागतं पण पूजा. म्हणजे काय विषबास असू द्यावा पण अंध नसावा.