पत्रकारितेच्या करीयरमध्ये इंदिरा गांधी यांच्याबद्दल अनेक घटना ऐकल्या. अनेकदा त्यांचा आदरार्थी उल्लेख, त्यांच्याविषयीच्या घटनांमुळे मनाला त्यांच्या जवळ जाण्यास, त्यांना जाणून घेण्यास प्रेरित करायचा. ज्यांना राजकारणाची गोडी आहे ते अभिमानाने इंदिराजींचा उल्लेख करताना म्हणायचे, एकदा निवांत वेळ काढून वाच या बाईला… याच भारतात, जिथे स्त्री नगण्य समजायचे तिथे ही स्त्री भारताची पहिली महिला पंतप्रधान झाली. केवढा सुवर्णक्षण असेल तो. केवळ स्त्री म्हणून नाही तर तिच्या अनेक धाडसी निर्णयामुळे स्त्रीचा अनादर करणारे पुरुष इंदिराजींबाबत अभिमानाने राजकारणाच्या चर्चा करतात. आज अशा कर्तृत्ववान स्त्रीला जग ‘पोलादी स्त्री’ म्हणून ओळखते. त्यांच्या या पदवी बहाल होण्यामागे अनेक कारणं आहेत नि काही देशात क्रांती घडणारे निर्णयही आहे, त्यात आवर्जून जिक्र करावा तर, १९६९ मध्ये इंदिरा गांधींनी घेतलेला बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय, हरितक्रांतीचा निर्णय, १९७१ मधील बांगलादेश युद्ध, १९७५ च्या काळातील आणीबाणी ( हा निर्णय बऱ्याच टीकाकारांना खटकला) हे निर्णय इंदिरा गांधीजींच्या कारकीर्दीत त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणारे ठरले. परंतु काही निर्णय घेताना झालेल्या चुकांमुळे देशातील अनेकांकडून त्यांची अवहेलना आणि अनादरही झाला.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधींजी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज देशाचे राजकरण समजून घेताना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा अर्थातच सुरुवात इंटरनेटपासून होते. कारण आपण आताच्या घडीला बलाढ्य जिवंत माहितीचा स्त्रोत म्हणून त्याची इंटरनेटकडे पाहतो. नेटवर त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या स्वयंपाक न करता येणं, भटकंतीची आवड असणं, फॅशन करण्याची हौस नसणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या खुनाबद्दल अनेक अफवा, अनेक गोष्टी आहेत. रंगवून सांगितलेले किस्से आहेत. त्यापैकी कोणत्या गोष्टी, कोणत्या घटना आणि कोणते पुरावे खरे हे कुणीच सांगू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूबाबत हे असं होणं शक्यच असते कारण त्यावेळी जे घडतं ते त्या व्यक्तीशिवाय आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित लोकांशिवाय कुणालाच माहित नसते. त्यामुळे लोकं स्वार्थासाठी त्यांच्यानुसार घटनेचे दृष्टिकोन बदलवतात. त्यामुळे इतिहास कधीच खरा नसतो, जो व्यक्ती तो मांडतो तो तथ्यापेक्षा स्वतःचा दृष्टिकोन त्यात मांडत असतो.
ओघात इंदिरा गांधीजींच्या बाबतीत इंटरनेटवर अनेक घटना वाचल्या. पण त्या घटनांना खरा जिवंतपणा तेव्हा मिळाला जेव्हा दिल्लीत पाऊल टाकलं, इंदिराजी कोणत्या पक्षाच्या कोणत्या घराण्यातल्या होत्या, याहीपेक्षा त्यांचं त्या काळातलं अस्तित्व हे अचंबित करणार होतं. आताच्या फेमिनिस्ट म्हणून मोठ्या होणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी होतं. कुठल्याच गोष्टीत स्त्री पुरुष भेद होऊ शकत नाही, कारण व्यक्ती कर्तुत्वाने मोठा होतो, जग त्याला कर्तुत्वानेच बघते, लिंग किंवा कुठल्याही भेदाने नाही.
त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यांवरून फिरताना इतिहासाच्या जिवंतपणाची खरी उधळण दिसते. तिथल्या वास्तूत आजही बलिदानाचे बोलके पुतळे दिसतात. तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नि तिथून बस सायकलने प्रवास करत जाणाऱ्यांसाठी ही पर्वणीच असत असेल. मी दिल्लीत पाच दिवस असेल पण त्या पाच दिवसांत बऱ्यापैकी राजकीय वास्तूंची आणि राजकीय संबंध आलेल्या ठिकाणांची भेट घेतली. त्याकाळात शेवटच्या दिवशी “इंदिरा गांधी स्मृती” संग्रहालयाला भेट दिली. हे संग्रहालय पूर्वी पंतप्रधानांचे राहण्याचे ठिकाण असायचे परंतु कालांतराने त्याला संग्रहालय बनवण्यात आले. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक वेगळाच फिल असतो मनात, प्रत्येक फ्रेम काचेत असते पण त्याला बघताना काचेचा अडथळा येत नाही. तिथे नेहरू- गांधी घराण्याचे जीवन, त्यांचे बालपण, त्यांचे मृत्यू आणि काही राष्ट्रीय चळवळी यांचे छायाचित्र कैद केले आहे. पण त्याचबरोबर तिथे इंदिरा गांधीजींच्या मृत्यू बाबतचे वृत्तपत्रातील कटिंग, राजीव गांधीजींच्या आयुष्याशी निगडीत काही घटना, त्याचे क्लिपिंग, पेन, कपडे, बॅग, त्याचबरोबर इंदिरा गांधीजींना त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या काळात मिळालेले गिफ्ट्स, त्यांची वाचनाची खोली, त्यांना आवड असलेल्या पुस्तकांचा संग्रह तिथे शाबूत आहे. इथे जाण्यासाठी मोफत प्रवेश आहे. कधी दिल्लीला जाण्याचा योग आल्यास हा अनुभव नक्की घ्या.
कारण दिल्ली फिरताना मनात नेहमी शब्दाचं नि ऐतिहासिक कल्पनांचे चक्र सुरूच असते,
लगता हैं,
“पल पल के बलिदान में एक नतीजे की दुनिया हैं,
इसलिए दिल्ली के हर सड़कों पर जीती जागती आज़ादी से लेकर नए इतिहास की खौफनाक दुनिया हैं| “
#दिल्लीकीसड़कोंपर
#Indira_gandhi_memorial
संग्रहालयातील काही महत्त्वाची छायाचित्रे खाली जोडत आहे.


























खूप सुंदर.. खरतर इंदिराजी ना समजून घेणं आजच्या सरकारला जमणार नाही. त्यांनी त्यांना आणि कांग्रेसला फक्त भ्रष्टाचारी शासन म्हणून स्मरण केलं आहे. पण स्वातंत्र्या नंतर आपल्याकडे काय होतं, ज्याने आपण आज इथवर येऊ शकलो असतो. काहीच नव्हतं. संपूर्ण देश अशिक्षित होता. जे लीडर बोलेल ते करायला तयार होते. त्याचा फायदा हवा तेवढा ह्या काँग्रेसने घेऊ शकला असता. पण देशात नवनवीन सुविधा नवनवीन विज्ञानाची शाळा कॉलेजेस, मोठं मोठे कारखाने, हॉस्पिटल्स, हॉटेल्स अभयारण्य; नद्यां वर धरणे इत्यादी असे देशाच्या क्रांती साठी उज्वल भविष्यासाठी जे काही केले आहे ते शून्यातून उभं केलं आहे.. त्यासाठी किती डोकं लावावे लागले असेक
किती मनस्ताप सहन करावा लागला असेल. त्यात धार्मिक उठाठेव आणि शेजारील दोन देश पाक आणि चीन यांची आक्रमणे, इतकं सोपं होतं का हे सगळं सहन करून त्याला प्रतिउत्तर देऊन आपल्या लोकांना प्रगतीपथावर आणणे.. बीजेपी आणि इतर नागरिक तेही खूप शिकलेले यांच्या मते काँग्रेस म्हणजे एक खाऊ सरकार आहे, भ्रष्टाचारी बस. आपण जे काही आज उपभोगत आहोत ह्याचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त कांग्रेसला जातं. मागे अटलजींचे सरकार होते त्यात सुद्धा गोगावा करून पोखरण अनु चाचणी केली. जिथे मूर्ख पाक लोकं भारतीयां प्रति कधी सहानुभूती किंवा आनंद व्यक्त करू शकत नाहीत , त्यांना हे बरं कसं सहन होईल. त्याचा तो रोष कारगिल युद्धात काढला. जे बोफार्स कांड ओळखलं जातं, त्याच बोफार्स कारगिल च्या रणात यशस्वी झाल्या. 2 जी घोटाळा म्हणतो हि 2 जी सेवा आलीच नसती म्हणजे आणलीच नसती तर आपण आज 5 जी स्वप्न पाहत आहोत ते पाहायची उमज च झाली नसती. बऱ्याच अशा उपक्रमांना परवानगी देऊन गरीबातील गरीब त्याचा उपभोग घेऊ शकेल अशा सवलती सुरु केल्या आहेत. पण ह्या सवलती
आपल्या पर्यंत पोचत का नाहीत.. म्हणजे पोचल्या का नाहीत., त्याचं मेन कारण आहे, आपल्या देशातील
अशिक्षितता कागदावर सही घेऊन आपल्या खिश्यात पैसे भरणारे आपलेच जवळचे नेते. प्रत्येक प्रांतात काँग्रेस थोडीच होती. तिथे होते आपण निवडून दिलेले नेते. त्यांनी माङया बांधल्या, सरकारी जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या, तिथे आपली पोटं भरण्यासाठी मोठमोठे कॉलेज, इन्स्टिटयूट, हॉस्पिटल्स उभे केले.. आज त्यांना काहीही कमी नाही, पण जनता जागरूक नको व्हायला म्हणून ह्या पार्टीतून त्या पार्टीत उड्या मारत आहेत.. इंदिराजीना संजाण्याधी काँग्रेसचं योगदान पाहायला हवं. त्याकडे दुर्लक्ष करवले जातंय… लिहायला खूप आहे. पण ह्या पोस्टने बोलतं केलंय. थँक्स पूजा.
वाह. यातल्या काही गोष्टी माझ्याही वाचनात आल्या नव्हत्या. खरंच, पोलादी व्यक्तिमत्व आहे. लोकांना समूह विचार करतो तसचं विचार करायची सवय लागते. तो प्रोब्लेम आहे. तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली, खूप खूप धन्यवाद ☺️