हॅलोविन काय आहे ?
हे नाव किती हॉरर आहे ? हे वेगळच काहीतरी असणार असं तारुण्यात येताना वाटू लागतं कारण ठिकठिकाणी हॅलोविन पार्टीज होऊ लागतात आणि जेव्हा पार्ट्या होतात तेव्हा कारण तर माहित असायलाच हवं…
तर काय गुपित आहे या हेलोविनचे ?
हॅलोविन की हॅलोविन इन? म्हणजेच हॅलोवची रात्र… ऑल हेलॉविन म्हणजेच सगळ्या हॅलोवची संध्याकाळ…
हॅलोव म्हणजे संत ….
सगळ्या संत, महात्मे, शूरवीर पुरुष, योध्ये यांच्या बलिदानाला समर्पित केलेली संध्याकाळ असा हॅलोविन फेस्टचा एकूण अर्थ होतो.
जगभरात ही संध्याकाळ ३१ ऑक्टोबरला एखाद्या सण उत्सवासारखी मोठ्या संख्येने साजरी केली जाते. अशी धारणा आहे की, ही संध्याकाळ ख्रिश्चन धर्म मोठ्या आपुलकीने साजरी करते. भूत किंवा भीतीदायक पोशाख करून चेहऱ्याला हॉरर मास्क लावून, शेकोटी पेटवून, दिवे लाऊन एखाद्या भीतीदायक स्थळी हॅलोविनची संध्याकाळ साजरी केली जाते. या रात्री भुताखतांच्या गोष्टी, हॉरोर चित्रपट, लॉस्ट डान्सिंग करून आत्म चिंतनात रात्र समर्पित केली जाते. आयुष्यातील सर्व चिंताना वाऱ्यावर सोडून ही रात्र व्यतीत केली जाते. आपले लोकं टेन्शन देणारे उत्सव साजरे करतात, त्यांच्या आयुष्यात हॅलोवीनची गरज अधिेक वाटते.
या क्षणी बटाट्याचे पॅनकेक्स आणि सोल केक्स यांची मेजवानी रंगवली जाते.याशिवाय या दिवशी काही ठिकाणचे लोक हे स्मशानभूमी येथे त्यांच्या प्रेमी व्यक्तिंकरिता प्रार्थना करून पुष्पगुच्छ ठेवतात. संपूर्ण थीम ही भूत किंवा लाल काळया किंवा गर्द रंगांची असते…
खालील दृश्यात डॅनियल या चित्रकाराने आयर्लंड येथे हॅलोविनच्या रात्री खेळ खेळताना मग्न असलेल्या लोकांचे चित्र चित्रिले आहे. एकोणिसाव्या शतकात आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये हॅलोविनची सुरुवात झाली असली तरी, कालांतराने उत्तर अमेरिकेत हॅलोविन मोठ्या प्रमाणात पसरला. विसाव्या शतकापर्यंत अनेक देशांनी या पाश्चात्य सणाला आपले मानले.


अशा पद्धतीने हॅलोविन सिंबोलाईज केली जाते.
छान माहिती..