एखादा युट्यूब व्हिडीओ डिसलाईक केल्यावर काय होते?
जास्त डिसलाईक्समुळे युट्युब रिकमेण्ड करतो ते रिकमेंडेशन येत नाही. त्यामुळे जी लोकं लाईक्स बघून म्हणजेच क्राउड मानसिकतेचे असतात. गर्दी जिथे तिथे काहीतरी चांगलेच असणार या विचाराने अनेक अपात्र व्हिडीओ अधिकाधिक पैसे कमावतात. परंतु, तरीही
युट्युबचे डिसलाईक्स विकत घेता येतात.
होय, काही वेबसाईट्स डिसलाईक्स डॉलर्समध्ये विकतो. हि किंमत पन्नास डिसलाईक्स हवे असतील तर एक ते तीन दिवसाच्या कालावधीत जवळपास ८ डॉलर्स एवढ्या किमतीला असतात. जेवढे लाईक्स हवे, तितकी जास्त किंमत मोजावी लागते.

पण डिसलाईक्सने व्हिडीओ मेकरला काय फायदा?
प्रेक्षकांना जरी वाटत असेल कि या आपल्या डिसलाईकने व्हिडीओ मेकरचा व्हिडीओ खालच्या पातळीचा ठरेल परंतु तसे होत नाही. कारण तुमच्या डिसलाईक्सने तो व्हिडीओ समतोल राखतो म्हणजेच, तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांचा विश्वास कमावण्यासाठी काही प्रमाणात डिसलाईक्स दाखवावे लागतात. कारण हजारो लाईक्स आणि एकही डिसलाईक नाही हे नॅचरल वाटत नाही.
डिसलाईक मॉबमुळे युट्युब चिंतेत :
युट्युबचे प्रोजेक्ट मॅनेजर टॉम लेनगु यांनी डिसलाईक मोब्ज म्हणजेच व्हिडीओ डिसलाईक करणाऱ्यांच्या टोळ्यांबाबत समस्या पुढे आणली आहे. याचा अर्थ काहीवेळेला विशिष्ट गटाला एखादा व्हिडीओ किंवा आशय न आवडल्यास हे गट मिळून व्हिडीओ बनवणाऱ्याला सतत टार्गेट करत राहतात. यामुळे एखाद्यावेळी न आवडलेल्या व्हिडीओमुळे व्हिडीओ मेकरच्या पुढच्या प्रत्येक व्हिडीओला डिसलाईक केले जाते. त्यामुळे हे मॉब अटॅक थांबवण्यासाठी “युट्युब लाईक्स आणि डिसलाईक्स यांची संख्या न दाखवण्याचा” उपाय पुढे आणत आहे.