त्याचा निनावी कॉल…

  • by

तो जाब विचारेल वगैरे असं काहीच होणार नाही… तरीसुद्धा? अचानक समोर भूतकाळ येऊन ठेपला तर?
स्वतःच्या आयुष्यात इतकं गढलेलं असताना त्याचा निनावी कॉल आला तर ….?
भूतकाळ आठवून त्याला सामोरं जायचं?, हाई हॅलो करून खुशाली विचारायची? की मग परतफेड म्हणून तिरसट वागायचं?

अनोळखी नंबरमुळे फोन खूप आधीच उचलला गेला होता. समोरून अनपेक्षित आवाज आल्यावर माझं चित्त थाऱ्यावर आलं. थरथरत त्यानेच सांगितलं ‘मी बोलतोय…’
यावर ‘कोण मी …’ विचारण्याचा मूर्खपणा मी केला नाही ते बरे !
मग पुढे काय बोलायचे ? ऑफ कोर्स बोलायला काही नव्हतं असं मुळीच नाही. उलट, भरभरून बोलायचं होतं अगदी पूर्वीसारखं, पण डायरेक्ट जाऊन एकदम ‘जसं काही झालच नव्हतं’ म्हणून बोलणंही ढोंगी होतं … नाही ?
मला माझा परिचय नाही द्यावा लागला, माझ्या हॅलोमध्येच त्याने मला ओळखलं. शिवाय नंबर त्याने डायल केला म्हणजे कुठेतरी माझा विचार झालाच होता नं?

शेवटी नात्यामधल्या गॅपमुळे आलेला पोकळपणा म्हणून स्वत:च्या मूर्खपणाचा नमुना म्हणून मी त्याची खुशाली विचारायची सोडून घरच्यांबद्दल विचारलं.
‘कसा आहेस’ हा साधा प्रश्नही माझ्याच्याने विचारवला नाही? विचारल असतं तर बरं झालं असतं का ?

पण मग भूतकाळाला परिचयाची पाटी लावून काय साध्य करणार होते मी ?
त्याच्या इच्छेने तो गेला. मी थांबवलं नाही हि गोष्ट वेगळी! पण म्हणून वर्तमानात त्याच्या नसण्याची कमी भासलीच नाही असं कसं म्हणू?
‘परिस्थितीशी तडजोड केली कि दुःख हळूहळू ओसरतं’ या त्याच्याच समजुतीवर तर भूतकाळातला प्रवास ओढत फरफटत निदान वर्तमानात पोहोचवला तरी. त्याच्यासारखं अर्धवट सोडून देणं मला नाहीच जमलं ना. माझ्या विचारांचा पारा चढतच चालला होता.

फोन चालूच होता. घरातल्या प्रत्येकाची, त्याच्या कुत्र्याचीही खुशाली विचारली मी. वाटलं होतं एकदा विचारावंच ‘सगळ्यांचं जाऊदे! तू कसा आहेस ते सांग’ पण ते बोलायलाही धजावले नाही मी. २-३ सेकंदांच्या त्या अर्थपूर्ण शांततेनंतर काहीही न बोलता फोन कट केला.
लईतलई ५ मिनटांचा तो फोनकॉल असेल,पण तेवढ्यात साऱ्या आठवणींनी आतापर्यंतच्या आयुष्याचा अख्खा इतिहास पिंजून काढला.
कोण चुक? कोण बरोबर? याची अख्खी प्रश्नपत्रिका माझ्यासमोर ठेवली. पण भुतकाळाला ‘भातुकली’ ची जोड देउन मी मागे बघायचे कष्टही नाही घेतले.
होय, भातुकलीच… कारण लहानपणीच्या भातुकलीसारखा तोसुद्धा फक्त माझ्या आठवणीतच राहिला.
तो गेला, त्यापाठोपाठ सोबत घालवलेले ते क्षणही गेले. क्षण जाळून टाकू लागले. सुरुवातीला त्रासांनी मन रक्तबंबाळ व्हायचं आता त्या जाळलेल्या क्षणांची राख उरलीय आयुष्यात तीही वजन नसलेली. पण कधीतरी डोळ्यात जाऊन अश्रू आणणारी. कारण सगळं खरं असलं तरी त्याच्या आठवणी मात्र पाठ सोडेना.
फोन ठेवल्यानंतर ”एकटेपणाचा दरवळ त्या अख्ख्या खोलीत मला छळत राहिला. साधा प्रश्न होता, या अंधाऱ्या खोलीत विखुरलेले किती कण माझे होते?
एक त्याची आठवण होती.
आरामदायी खुर्चीत पहुडलेला आरसा यत्किंचीतही एकटा नव्हता, त्याला खचखचून गर्व होता, त्याच्या एकटेपणाचा नि मला ? खचखचून दु:ख होत माझ्या दुबळेपणाचं…
प्रकाशाच्या परिगकणातुन त्याची प्रतिमा नाहीशी झाली, माझ्या पैंजणाची धून आता आठवतंही नसेल ना त्याला? शेवटचा गजरा केव्हा माळला होता रे? आठवतोय?
तो गंधही वेणीवर कुजलाय, पण जिवंतय! आनंद आहे…

रस्ता आता एकटीच क्रॉस करते मी. तुझ्या आधाराची गरज नाहीच भासत…
“क्योंकी खालीपन से हमारे पैरों में इतनी जान तो भरही दी थी आपने।
लेकिन हिम्मत जुटा कर एक गहरा सच कहूँ तो, आँखों का समंदर खोकला हो गया हैं।
आपका नाम लेते ही नदियाँ बहाने लगता हैं॥
काफी चुप से हो गए हैं हम ….”

या अचानक झालेल्या फोनकॉलच्या अतिवृष्टीने मात्र, वाटसरू होऊन पायवाट चालुही शकत नाहिये, ना अपंग असल्याचा आव आणु शकतेय…. राहुन राहून मनाचा पाट एकाच ठिकाणी बांध घालतोय,
‘मी नाही तर नाही, निदान तो तरी विचारु शकत होता,” कशी आहेस” म्हणून?’ पण त्यानेही नाही विचारलं…
अशावेळी इतक सामंजस्य तरी असावं कि संवाद नि नात्याची एक्स्पायरी डेट संपलीय. आता थांबायला हवंच ….
“पण असं असतं तर माझा आवाज ओळखून त्याने लगेच फोन ठेवला असता ना? किंवा मग तोसुद्धा हादरून गेला असेल या अनपेक्षित ट्विस्टने?
ओह्ह्ह गॉड… कित्ती साऱ्या शक्यता मी पडताळून पाहत होते किंवा दिलासा देत होते स्वतःलाच? कि मग तळमळ होती ती, त्याला पुन्हा माझ्या आयुष्यात आणण्याची? माझं उत्तर मला मिळालं…
भुतकाळाशिवाय माणूस दुबळा असतो, मला पटलंय. भूतकाळ एकतर जगण्याची नवी उमेद देतो, नाहितर आयुष्यभरासाठी पांगळा बनवतो… याच्याबाबतीत मात्र दरवेळी, दरवेळी सोबत असतानाही तो आधार होता आणि आज पुन्हा एकदा माझा आधार बनला….

दिल की आवाज सिर्फ इतना ही कह रही थी,
क्या हुआ अगर मेरी मोहब्बतने मुझे तोड़ दिया,
क्या हुआ अगर मेरे मोहब्बत के चर्चे हर मोहल्लें में बाटें गए ?
लेकिन मेरी मोहब्बत इतनी मजबूत थी,
जिसने टूटने पे मजबूर भी किया और फिरसे खड़े होने की उम्मीद भी दीं ॥
खुश थी में। ….. 

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *