अमेरिका महासत्ता आहे पण, चीनने आपले प्रयत्न चालू ठेवले. चीनने देशापेक्षा देशातील लोकांना काबीज करण्यास सुरुवात केली. लवंगी फटाक्यापासून सुरू झालेला चीन आज जगातील अर्थव्यवस्था, लोकसंख्या, व्यापार या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रात टॉपला झळकत आहे. शिवाय आपल्या भगवान बुध्दापासून माँ काली पर्यंत जे आपण जवळ नाही केलं ते चीनने पुजले. शिवाय कून्फू ही त्यांची ताकद आहे. चीन मोठा होण्याची कारणे कोणती होती?
आपल्या इथे म्हटले जाते, चायनीज भाषा वेगळीच आहे, तिथले लोकही… सगळे सारखेच असतात …? पण आपण एवढं चायनीज फूड खातो, ते भारतात कसं आलं.? चायनीज भाषा इतकी महत्त्वाची का आहे? काय वेगळेपण आहे? अवघड आहे का? हे सगळं एक प्राचीन इंटरेस्टिंग गूढ आहे.
भाषेपासून सुरुवात केली तर, जशी फ्रेंच ही प्रेमाची भाषा तशी चायनीज ही वास्तविक भाषा आहे. आज चायनीज जाम इंटरेस्टिंग लँग्वेज आहे. कारण चिनी लोक आजही प्राचीन लिपीत लिहिली जाणारी भाषा तिथे वापरतात. या भाषेचे इंग्रजी, जर्मनीसारखे मुळाक्षरे नसतात. ज्याप्रमाणे भारतात २२हून अधिक भाषा बोलल्या जातात त्याप्रमाणे चीनमध्ये ३०० हून अधिक भाषा बोलल्या जातात.
त्यामुळे चीनच्या लोकसंख्येमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा ही चायनीज आहे.
पण चायनीज भाषा म्हणजे नेमकी कोणती भाषा?
तर चीनमधील एकूण लोकसंख्येच्या १ बिलियन लोक म्हणजे १०० टक्क्यांपैकी ७० टक्के लोक हे स्टॅंडर्ड मॅन्डरिन ही भाषा बोलतात. त्यामुळे मॅन्डरिन ही चीनची प्रथम भाषा आहे.
भारतामध्ये ज्याप्रमाणे फॉरेन लँग्वेज शिकण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे, त्यात चायनाची मॅन्डरिन कुठेही मागे नाही. पण जितकी इंटरेस्टिंग भाषा तितकी रिस्की आणि वेळखाऊ प्रक्रिया असते.
कारण चीनच्या प्राचीन भाषेत मुळाक्षरांची जागा ‘कॅरेक्टर्स’ घेतात. एका कॅरेक्टरचे चार उच्चार असतात. असे पूर्वी पन्नास हजार कॅरेक्टर्स होते. आता ते वीस हजार करण्यात आले आहे. सुशिक्षित चायनीज माणसाला अंदाजे ८ हजार कॅरेक्टर्स येतात. नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २-३ हजार पुरेसे असतात.
चायनीज अवघड आहे का हा प्रश्न असेल तर प्रत्येक भाषा अवघडच असते.
पण रियाज, उजळणी! हा उपाय असतो.
कोणतीही भाषा सतत प्रयत्न केला, त्याचा डीपली अभ्यास केला तर सोपी वाटू लागते. तसेच मॅन्डरिनचे आहे.
आपल्याकडे चायनीज भाषेचा ट्रेण्ड आहे, मग चायनामध्ये कोणत्या भाषेचा ट्रेण्ड आहे. ?
आपण भाषा शिकतो कारण बाहेरील देशांसाठी काम करून अधिक पैसा मिळेल. पण चायनीज लोक भाषा शिकतात कारण त्यांना आपल्याशी आपल्या भाषेत संवाद साधून त्यांची भाषा आपल्याला शिकवायची असते. त्यांचा स्वाभिमान कुठेही सुटत नाही, आणि ते सोडतही नाही.
चायनीज लोक हे संपूर्णपणे महासत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अमेरिका ही पहिली महासत्ता असल्या कारणाने चायनामधील लोक हे मोठ्या प्रमाणात इंग्रजी शिकण्यावर भर देत आहे. इंग्रजी यासाठी कारण ज्या लोकांना इंग्रजी येते अशा नॉन चायनीज लोकांना चायनीज भाषा शिकवण्यासाठी.
चायना नेहमीच स्वअस्तित्वावर ठाम राहिल्यामुळे तिने तिची पायामुळे कधीच सोडली नाही. त्यामुळे चायना ही जगात एकमेव भाषा आहे जी आजही प्राचीन लिपीमध्ये लिहिली जाते.
आजच्या घडीला सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था चीनची आहे. कारण चीनने जागतिकीकरणाचा फायदा घेऊन ग्राहकांच्या गरजांवर आणि गरजांबरोबर त्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीवर लक्ष्य केंद्रित केले. त्यामुळे स्वदेशी पेक्षा अनेक देशांनी चीनमधील वस्तूंना पसंती दर्शवली. त्यामुळे फटाक्यांपासून खिशातल्या ५ हजाराच्या एमआय फोनपर्यंत चिनी मालाने आपल्यावर कब्जा केला. हा कब्जा लोकांच्या मनावर झाला. त्यामुळे भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये स्वदेशीचे नारे मोजक्यानी लावले आणि ते संपुष्टात आले. चिनी माल मात्र कायम आहे.
शिवाय, भारताचे सरकारी कामकाज हे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत चालते. पण त्या तुलनेत चिनी लोकांचे कामकाज हे त्यांच्याच भाषेत चालते. त्यामुळे प्रत्येक देशातील सरकारला चीनची मॅन्डरिन भाषा शिकलेल्या नागरिकाची गरज असते. कारण चीनच्या सरकारी दफ्तरातील व्यवहार इतके दिवस गुप्त राहण्याचे कारण म्हणजे त्यांची भाषा.
हे कारण लक्षात आल्यानंतर मात्र प्रत्येक देशाने मॅन्डरिनचे महत्व ओळखला सुरुवात केले आहे.
चायनीज फूडला एवढा मान का?

शिवाय शेजवान, फ्राईड, हक्का नूडल्स, मंचाहू सूप, व्हेज ड्राय मंचुरियन आणि काय काय? …
सगळं चायनाचं!
एकेकाळी चिनी लोकांच्या डोळ्यांना आणि त्यांच्या अस्वच्छ खाद्यांनाला नावे ठेवणारे भारतीय आज चवीला म्हणून चायनीज पदार्थ निवडतात. ?
सुरुवातीला इतर चायनीज लोकांबरोबर यंग तै चाऊ हा पहिला चायनीज व्यापारी भगवान बुध्दांच्या शोधात भारतात आला होता. त्यावेळी त्याने व्यापराकरीता कोलकातामध्ये आपले बस्तान बसवले. त्यावेळी ब्रिटिश इंडियाची राजधानी कोलकता होती. त्यामुळे हळूहळू तिथे अनेक चिनी व्यापाऱ्यांनी आपल्या मालासह भारतात प्रवेश केला. त्यात सॉस उत्पादक, कॉस्मेटिक व्यापारी, शूज उत्पादक भारतात आले. भारतीयांनी प्रत्येक विविधते प्रमाणे चायनीज लोकांनाही स्वीकारले. एवढेच नव्हे तर चिनी लोकांनी भारतीय संस्कृतीतील देवी काली हिला आपली देवी म्हणून स्वीकारले. आणि नूडल्स, चोपसी, भात आणि भाजीपाला हे भारतीयांना ऑफर करून एकजुटीची परंपरा कायम केली. तेव्हापासून भारतात चायना भारत फ्युजनची परंपरा सुरू झाली.
पहिले चायनीज रेस्टॉरंट ;
साधारण ८५ वर्षापूर्वी नवीन पाककृती कला उदयास आली होती. पहिले इंडो चायना रेस्टॉरंट ईउ चिउ हे कोलकता मध्ये उघडण्यात आले होते. हे नवे क्युजिन (किचन) नेमकी काय भानगड म्हणून अनेकांनी याची चव चाखली. तिखट पण चटपटीत पदार्थ अनेकांच्या जिभेला तडका देऊन गेले.
भारतीयांना चायनीज इतकं का आवडलं?
याचं उत्तर भारतीयांच्या आवडी निवडीतच आहे. भारतीयांना तिखट, तेलकट तर्री आणि मसालेदार तडका आवडतो. त्यामुळे, या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे हे चायनीज फूड !
चीनमधील उणिवा:
जर्मन, फ्रान्सच्या तुलनेत चायना आयटी हब्ज १ टक्केही नाही. याचे कारण म्हणजे भाषा. मुळात मॅन्डरिन अवघड भाषा, त्यामुळे ती शिकायला ५ ते ६ वर्षे आरामात जातात. त्यामुळे नव्याने ट्रेण्ड सुरू झालेल्या मॅन्डरिनकडे तरुण मुले पाठ फिरवतात. त्यामुळे चिनी भाषेचा लीटरसी रेट कमी आहे पण …
देशी पालक मात्र जागरूक आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शाळेपासूनच जापनीज, जर्मनपेक्षाही मॅन्डरिन ही भाषा निवडायला प्राधान्य देत आहे.
भाषेमुळे लख्ख आहे चीन संस्कृती !


त्यांची लेखी भाषा हा त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भाषेचे वेगळेपण आणि प्राचीन शैली हा चिनी लोकांसाठी गर्वाचा विषय आहे. मॅन्डरिन भाषेचे कॅरेक्टर्स त्यांच्या प्राचीन इतिहासाचा संदर्भ देऊन लिहिले जातात. या माध्यमातून कॅरेक्टर्स शिकणाऱ्या माणसाला शास्त्रीय आणि पुरातन चीनही समजून सांगितला जातो. कॅलिग्राफी कलेला चीनमध्ये विशेष स्थान आहे.
भारताने संस्कृत, हिंदी आणि आपापल्या प्रादेशिक भाषा मागे टाकून इंग्रजीला बलस्थानी ठेवले. परंतु चिनी लोकांनी त्यांची भाषाशैली बदलली नाही. त्यांनी ती लोकांना स्वीकारायला भाग पाडली.
याशिवाय, चिनी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव जपान आणि कोरिया देशांच्या इतिहासावर झालेला पाहायला मिळतो. या दोन्ही देशांत आजही चायनीज कॅरेक्टर्स शिकवले जातात.