आदल्या रात्री चित्राने लग्नाबद्दल खूप विचार केला. घरात असही रिश्ता घेऊन येणारे दुश्मन कमी नव्हते. त्यामुळे तिचं विचार करणं साहजिक होतं.
तिच्या मनात अनेक नको त्या विचारांनी थैमान घातलं होतं, लव्ह मॅरेज केलं तर, म्हणजे माझ्या अशोकबरोबर लग्न… पण त्यामुळे माझी आताची कम्फटेर्बल लाईफ जशीच्या तशी राहील? उद्या जेव्हा मी त्याच्याशी लग्न करेल तेव्हा हे जे स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते सगळं असंच राहील?
आज घरात शॉवर, कंटाळा आला तर तोही, मनमर्जी, चहा नाष्टा जेवण हातात येतं. उद्या हे सगळं मला करावं लागेल, ते साहजिक आहे आणि स्वीकारेलही मी … पण मग ही सगळी तडजोड मी रोज लाईक दररोज करू शकेल?
आणि जर याचे उत्तर नाही असेल तर मी प्रेम नाकारून अशोकबरोबर लग्नाला नकार देऊ…?
चित्राच्या डोक्यात खूप दिवसाचं हेच घोळत होतं. कारण चित्रा ही प्रॅक्टिकल मुलगी होती. तिला माहिती होतं, लग्न म्हणजे एका व्यक्तीबरोबर पुढची ५० वर्षे तरी काढायची आहे. त्यामुळे आता विचार नाही निर्णय घेण्याची वेळ आली होती. शेवटी हे सगळं अशोकला सांगून डिस्कस करावं म्हणून तिने अशोकला भेटायला बोलावलं.
समोर अशोक कधी येऊन बसला तिला कळलंच नाही.
“आपण लग्न करणार आहोत ना ? ”
त्याने इतर काहीही न बोलता मुद्द्याला हात घातला. त्याचेही बरोबरच होतं. चार वर्षाच्या नात्यानंतर ही चित्राने एवढा विचार करणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं.
पुन्हा चित्राच्या डोक्यात, ‘की मग अशा कोणाशी लग्न करू ज्याच्याकडे आता सगळचं आहे. ?
म्हणजे अरेंज मॅरेज. सगळं सोर्टेड.!
खरंच?
मग अशोकचं काय? ” ती अजुनही मनातल्या मनात भरकटली होती.
“तू अरेंज मॅरेजचा विचार तर नाही ना करते?” त्याने तडक विचारून टाकलं. कारण त्याला माहिती होतं चित्रा हे करणं अगदीच शक्य आहे. पण तरीही त्याला थोडा विश्वास प्रेमावरही होता.
“ऐक ना,” तिने त्याचा अंदाज घेत त्याला समजावणीच्या भाषेत म्हटलं.
मी काय विचार करते तुला सांगते. पण तू मला जज करणार नाहीस, ना कुठल्याच विक्षिप्त नजरेने पाहणार नाहीस. तर सांगते…
“चित्रा…” त्याने टेबलावर असलेल्या चित्राच्या हातावर हात ठेवत धीर देत म्हटलं, “बोल. मोकळं वाटेल तुला. “
“तर ना…” ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून हे म्हणू शकत नव्हती त्यामुळे तिने घट्ट डोळे मिटले आणि बोलायला सुरुवात केली.
“तर … जर मी तुझ्या सोबत राहिले तर मला मी आज जशी राहते तसं राहणीमान बदलाव लागेल. अगदी सगळचं आणि मला ते जमलं नाही तर…?
लग्न म्हणजे काय खेळ नाही ना यार …! हा ‘जमलं नाही तर’ आहे ना. त्या तर मुळे वाटतं, की मग मी अशा कोणाशी लग्न करू ज्याच्याकडे आता सगळचं आहे. ? सगळचं म्हणजे ऑफ कोर्स पैसा… पण म्हणजे अरेंज मॅरेज.! सगळं सोर्टेड.!
पण हातात काय राहील? ”
चित्रा कुठलाही विचार न करता आपलं मन प्रियकरासमोर ठेवावं तितक्या नितळपणे बोलत होती… अशोकचा चित्राच्या हातावरचा हात घट्ट होत होता…
त्याच्या त्या घट्ट विश्वासाने सुखावून तो स्पर्श मनात मिटून ती बोलू लागली…
“आज मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. तुझ्यात मला समजून घेण्याची ओढ आहे. तुझ्यासह मी तुझी होताना सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या दोघांचा सहवास असेल. मात्र अरेंजमध्ये अलरेडी सगळचं मॅनेज असेल. विकत आणलेल्या नकली फुलासारखं…
ही अरेंज मॅरेज ही दाखवायला केली जातात, असं माझं ठाम मत झालंय… म्हणजे तुम्ही जोडीदार निवडतात. त्यातही तुम्ही एकतर पालकांच्या निवडीने पसंत करतात, ज्यात संसार तुम्हा दोघांना असणार असतो, ते का निवडतात हे मला अजुन कळलेलं नाही. त्यांची काळजी, अनुभव आणि प्रेम या तिन्हीमुळे एखाद्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आणि हक्क स्वतंत्रपणे त्या दोन व्यक्तींना असावा. तिरहाईत कुणालाही नाही!
पण अशोक गरीब आहे म्हणजे तुला स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग निवडायचं तर अरेंज मॅरेज.! सगळं सोर्टेड.!
अरेंज मॅरेज केलं तर,
घर, टॉवेल, संस्कृती, परंपरा, दॅट्स इट!
पण संस्कृती, दबाव, उलाढाल, तडजोड, मानसिक उचल साचल, अपेक्षाभंग दॅट्स सक्स!
लग्न अरेंज झालं… लव्ह कल्पनेत जगायला ठेवायचं… क्या उस गली में कभी तेरा जाना हुआ। म्हणत ती गली फक्त भूतकाळात ठेवायची? ”
चित्राच मन इतका वेळ खूप शांत फिल करत होतं… अशोकच्या हातातल्या स्पर्शाने समजुतीचा संवाद साधला होता.
चित्रा आता डोळे उघडून अशोककडे पाहू लागली… “तूच सांग आता काय करावं या गोंधळात.? “
“उम… तू थांब. एक काम कर, तू आता जे म्हटली ना अरेंज मॅरेज चे ते कल्पना कर जर तुझ्याकडे सगळचं आलं. ही सगळी कल्पना करून कसं वाटते सगळं सांग ” अशोक शांतपणे म्हणाला.
चित्रा बोलू लागली, जर बघ हां कल्पना केली, माझं अरेंज मॅरेज झालंच तर घर आहे, गाड्या आहे, कॉलेजात पैशांवर प्रेम करणारा नवरा करेल म्हणून मिरवायला पैशास ह नवराही आहे…
पण आज ना, खूप आतून चित्रा दुखी आहे पण चित्राला ओसरीवर बसावं वाटतं नाही. कारण,
ओसरीवर वाट पाहायला लावणारं प्रेम नव्हतं, ना ते ओसरीवर वाट पाहणाऱ्या नजरेला कवेत घेईल असा प्रियकर तिचा नवरा होता.
ओसरीवर बसून जेव्हा चित्राची नजर दूर वाटेवर असेल तेव्हा चित्राच्या चेहर्याचा चंद्र प्रियकराची वाट पाहील तेव्हा चंद्राचा प्रियकर म्हणून अरेंज नवरा हा वाट पाहणारा चंद्र ओंजळीत घेईल?
मला माहिती आहे, तो नाही घेणार… आणि तेव्हा या चंद्राची विटंबना नि हसे होईल तिथे….
“आणि मी असं होऊ देणार नाही. कारण तुझं आभाळ अजुन जिवंत हाय, आन चंद्राची किंमत ही चंद्राचं सुख आणि त्याची किंमत असणाऱ्याला आहे… त्यामुळे लग्न करशील माझ्याशी?” अशोक उत्तरला.
आता मात्र कुठलीच कानकुस न करता चित्रा त्याच्याकडे पाहत राहून अलगद हसून त्याच्या मिठीत शिरली…