सच़ है येsss बस एक बार मिलतिsss है जिंदगी|
करवटेंsss बदलती है पल पल ये जिंदगी……
अहाहा… रेडियोवर गाण चालू आणि इकडे ‘याची’ बरसात.. जगातल बेस्ट एवर कॉंबिनेशन..
आणि आज आनंद बेभान होता ‘तो’ मनसोक्त बरसल्याचा, इतक्या दिवसांच वाट पाहण संपल होत. आनंद होता मी चिंब भिजल्याचा, त्याला स्पर्श केल्याचा, आणि सगळ्यात जास्त आनंद होता तो निसर्गाला उघड्या डोळ्यानी सजताना बघण्याचा.
हो, खरच निसर्गाला नटलेल बघण्यासारख सुख नाही जगात. अर्थात प्रत्येकाच्याच कवीतांना या गद्दार पावसात पिल्ल होतात, माझ्या लेखणीन् आज ते नाकारलं पहिल्यांदा, कारण ते सौंदर्यच इतकं अचंबित करणारं होतं, रोजचंच होत पण आजचं वेगळं फुललं होतं, शब्दांच्या पलीकडचं. खर सांगू तर किती बघू नि किती नको होऊन गेलं होतं कारण, ‘ त्याच्यासारखा रचनाकार होणे नाहीच खरे!’.
या नवख्या वसंतात गीताचे बोल जरा जास्तच जवळचे वाटतात. तशीच भिजत भिजत, गाणं गुणगुणत, लोकांना थिजलेल बघत, मजा घेत घरी पोहोचले. अपेक्षित होतच, आईसाहेबांनी दार उघडले. हातात टॉवेल आणि बोलण्यात काळजीचा चपराक घेऊन. तिनेच केस पुसले आणि जवळही घेतलं फटकाऱ्याने. मोठ झाल्यावर’ अशा ओरड्यातूनच प्रेम मिळतं मुळात. मग आयता चहाही आला. अशा सगळ्यात रेडियोची शेवटची पावसाळी धून कानावर आली,
गारवाsss वार्यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा,
प्रिये नभांत ही चांदवा नवा नवा …
पुन्हा एक नव आयुष्य जन्म घेत या वसंतात , हिरवी शाल पांघरत, लहानपनीच्या पावसाळ्यातल्या निबंधासारख…