कशाला स्त्री पुरुष समानता?

  • by

महिला दिवसाचं माझ्या आयुष्यात महत्त्व काय? असा साधा प्रश्न येतो.

“मुले – मुली समान असायला हवे.
मला मुलांसारखे आयुष्य जगता यायला हवे.”
मुलांसारखे म्हणजे कसं? याचा थेट संबंध स्वातंत्र्याशी जोडावा का?
मुलांसारखे कपडे, वागणूक, की मग आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन?
या परिस्थिती मागे विचारांची मोठी वंशावळ आहे.
म्हणजे विचार केला तर मला एका बाजूला बंड करून उठणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई दिसतात, झाशीची राणी दिसते, आई जिजाऊ दिसतात. या स्त्रिया अशा लाजऱ्या, मुळमुळ्या, नाजूक होत्या का? त्यांनी जे केलं त्याने इतिहास घडला आहे..
नाजूक असण्यात गैर काही नाही.
पण स्त्री म्हटलं की काचेची वस्तू असल्यासारखं वागवणे आणि तिने स्वतः ते स्वीकारून तसच वागणे कितपत योग्य आहे?
मनुस्मृती बद्दलचे वास्तव आजही जळले नाहीये. स्त्रिया त्याच गुलामीत जगतात. आजही त्यांना स्वतःला त्यांच्या पायावर उभे राहून निर्णय घेता येत नाही. बऱ्याच स्त्रिया तर स्वतःहून चूल मुल यात रमून दबून राहतात. त्यांनी संसारात रस घ्यावा पण त्यांना व्यावहारिक पातळीवर निर्णय घेणं शिकायला हवे. जेव्हा घरातली एक बाई सर्वगुण संपन्न होते, तेव्हा ते कुटुंब विकसित होते.

इथे ‘मला मुलांसारखे आयुष्य हवे’ याचा अर्थ स्त्री पुरुष दोघांना लहानपणापासून एकसमान निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. ‘निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य’ हा विशेष हक्क मोठा बदल घडवणारा आहे.
त्यात समानता मिळायला हवी. त्याबाबत लहानपणापासून एकसमान वागणूक द्यायला हवी. ‘तू स्त्री आहे तुला यातलं कळणार नाही’, हा विचारच कोणाच्या मनात यायला नको. कारण जेव्हा माणूस निर्णय घ्यायला शिकतो तेव्हा त्याचे अवलंबन संपते. निर्णय घेताना चुकल्यावर माणूस शिकतो. पण मुलगी चुकेल आणि ती चुकली तर समाज काय म्हणेल यातच आपण अडकलो आहे. तिला मुलासारखे चुकू द्या, शिकू द्या, संघर्ष करू द्या!

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *