“बोलक्या तुझ्या ओठांतून माझा क्षण मी चोरून घेते,
बोल घरी सांगु का कालचा गुलाब तू दिला होतास ?”
काही न बोलून काही होणारे का.? काहीतरी तर बोल.काल पाऊस पडला त्यामुळे आपोआपच घरच्यांना सगळं कळलं. त्यात तू तो गुलाब वहीत घालून दिलास.
बाबांनी तपासली कि वही…
मला म्हणे ‘फुलवाले पण गुलाब द्यायला लागले वाटतं ?’
मग काय..? बोलावं लागलं खोटं
‘बाबा… फुलवालेच तर गुलाब विकतात’
मग त्यावर पुन्ह: प्रश्न
‘विकतात ..? हा गुलाब फुलवाल्याकडून विकत घेतलेला नाही दिसते. ‘
‘काय बाबा तुम्ही पण … तुमच्या मुलीला काही आवडलं तर ती ते विकत घेऊही नाही शकत का ? ‘ मी अतिशहाणपनात म्हटलं.
‘म्हातार्याला तरुणपणाचं खोटं विकणं पाप आहे मुली.’ बाबा मस्करीत म्हटले, तिथेच तु जिंकलास.
बाबा खूप इमोशनल होतात रे…..
म्हणे,
‘सांग तुझ्या त्या काट्याला… खर्या गुलाबाला नीट जप म्हणावं.
आणि ए माझ्या गुलाबा …
पुढच्यावेळी फुलवाल्यालाही घेऊन ये सोबत…. बघु तर दे माझं चोरलेलं गुलाब कसं जपणारे ते …’
त्यामुळे पुढच्यावेळी तु घरी ये बिंदास्त … आणि हो सोबत गुलाबाचं उत्तर घेऊन ये. बाबा खूप हळवा आहे , कठोर होईल त्या क्षणी.
बाकी गुलाब का फूल उनके लिये भी लाना जरुर,
क्या पता तुम्हें पसंद कर ले |
“कालचा गुलाब” fb वर वाचले हे आर्टिकल… अप्रतिम लिहलय… तुझ्या सर्व पोस्ट अशाच हटके आणि सुंदर असतात… मनाला खुप भावतात प्रत्येक वाचकाच्या… मलाही हा अनुभव आला… आज तुझ्या लिखाणात एक वेगळंपण जाणवले.. एरव्ही तु खुप लिहतेस.. तुझी पोस्ट खुप मोठी असते पण पुर्ण वाचावी अशीच अर्थपूर्ण सुध्दा असते…. आज कालचा गुलाब वाचताना हि पोस्ट खुपच लवकर संपली असं वाटलं… खरं तर त्याचा आणि तिचा संवाद… तिच्यात आणि बाबांच्यातील संवाद असेच पुढे चालू राहून खुप छान वाचायला मिळावं असं वाटत असतानाच तु अगदी थोडक्यात लिखाण उरकलं… तु ना पुजे खरंच ग्रेट आहेस गं… कारण खरं आवाहन हे कमी लिखाणातच असंत.. आज तु ते लिलया पेललं… एखादा गायक वा वक्ता यांना जर वेळ कमी आहे असं सांगितलं तर त्या कमी वेळात ते जीव ओतून सादरीकरण करतात… हिच खरी त्यांची प्रतिभा असते… तु सुध्दा आज तुझ्या उत्तम प्रतिभेच दर्शन दिलस… कमी ओळीत एक छान रोमँटिक विषय हाताळलास… सांग तुझ्या त्या काट्याला, ह्या खऱ्या गुलाबाला जप म्हणावं…. हि ओळ तर अप्रतिमच होती… पण पावसाने काहीच लपवून ठेवलं नाहीस असा आरोप करत अगदी छान सुरुवात केलीस 💜
Thank You so much Padmey ☺️